

Renault Duster Returns: रेनॉल्ट इंडियाची आयकॉनिक एसयूव्ही 'डस्टर' भारतात लवकरच लाँच होतेय. येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ही गाडी लाँच केली जाईल, असं कंपनीने सांगितलं आहे. जुलै २०१२ मध्ये डस्टर भारतामध्ये लाँच झाली होती. या गाडीने मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटची पायाभरणी केली. त्यावेळी भारतीय बाजारात एसयूव्ही म्हणजे एकतर मोठ्या आकाराच्या प्रीमियम गाड्या किंवा कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर अशी स्थिती होती. पण डस्टरने या दोहोंचा मध्य साधला होता.