

Restore Old Photos AI Prompt
Sakal
Best AI tools for old photo restoration: एआयच्या युगात आता जुन्या, फाटलेल्या किंवा पिवळट पडलेल्या फोटोंना नवीन डिएसएलआलमध्ये काढल्यासारखे बनवता येणार आहे. पूर्वी फोटो रिस्टोरेशन म्हणजे तासन्तास एडिटिंग, प्रोफेशनल्सची मदत आणि महागडी साधनं या सगळ्यांची गरज लागत होती. पण आता फक्त एका साध्या AI Prompt च्या मदतीने कोणताही जुना फोटो काही सेकंदांत क्रिस्टल क्लियर करता येणार आहे. चेहऱ्यावरचे तडे, पार्श्वभूमीतील डाग, रंग फिके पडणे किंवा फोटो धूसर दिसणे यासारखे हे सर्व एआय टूल्स एका क्लिकमध्ये दुरुस्त करता येणार आहे.
यामुळे आपल्या आजोबा-आज्जींचे, जुन्या कार्यक्रमांचे किंवा बालपणीचे फोटो पुन्हा जिवंत वाटतात. AI Restore Old Photos ही तंत्रज्ञानाची अशी सोपी पद्धत आहे की सहज शिकता येणार आहे. तुम्ही योग्य प्रॉम्प्ट वापरून तुमच्या जुन्या फोटोला नव्यासारखे बनवू शकता.