Robot Guide Dog : दृष्टीहीन व्यक्तींना मदत करणार 'एआय रोबोट डॉग'; पाहा कसं करतो काम

Tefi Robot Dog : टेफी असं या रोबोटचं नाव आहे. स्पेनच्या हायर काऊन्सिल फॉर सायन्टिफिक रिसर्च (CSIC) विभागाने हा रोबोट श्वान तयार केला आहे.
Robot Guide Dog Tefi
Robot Guide Dog TefieSakal

Robot Guide Dog for Visually Challenged People : जगभरात सुमारे 200 कोटींहून अधिक व्यक्ती दृष्टीहीन आहेत. यातील बहुतांश लोकांना दुसऱ्यांवर विसंबून रहायला आवडत नाही. अशा व्यक्तींना घरातून बाहेर पडण्यासाठी देखील एखाद्या व्यक्तीची मदत घ्यावी लागते. मात्र, आता एआयमुळे हे सोपं होणार आहे. स्पेनमधील संशोधकांनी दृष्टीहीन व्यक्तींना रस्ता दाखवण्यासाठी एक एआय रोबोट डॉग बनवला आहे.

टेफी (Tefi) असं या रोबोटचं नाव आहे. स्पेनच्या हायर काऊन्सिल फॉर सायन्टिफिक रिसर्च (CSIC) विभागाने हा रोबोट श्वान तयार केला आहे. हा रोबो-डॉग घरामध्ये आणि घराच्या बाहेर देखील दृष्टीहीन व्यक्तींची मदत करू शकतो. यामुळे अशा दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन कामे करण्यासाठी मदत होणार आहे.

श्वानांना चांगला पर्याय

कित्येक ठिकाणी दृष्टीहीन लोकांना रस्ता दाखवण्यासाठी ट्रेन केलेल्या श्वानांची मदत घेतली जाते. मात्र, काही लोकांना श्वानांची भीती वाटते, तर काही परिस्थितींमध्ये श्वान योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकत नाही. यामुळे रोबोट डॉग हा खऱ्या श्वानांना चांगला पर्याय ठरू शकतो. (Robot Guide for Blind People)

काय आहेत फीचर्स?

या रोबोटमध्ये जीपीएस, अत्याधुनिक कॅमेरे, मायक्रोफोन आणि साऊंड देण्यात आले आहेत. हा तोंडी सांगितलेले आदेश ऐकू शकतो. हा गुगल मॅप्सचा वापर करू शकतो. तसंच, आपल्या मालकाशी संवाद साधण्यासाठी स्पीचचा वापर करू शकतो. एआय टेक्नॉलॉजीच्या मदतीने तो समोर येणारी गोष्ट ही वस्तू आहे की दुसरी व्यक्ती हेदेखील ओळखू शकतो. (Tefi Robot Dog Features)

Robot Guide Dog Tefi
Odysseus Earth Selfie : अमेरिकेच्या 'चांद्रयाना'ने अंतराळातून पाठवला फोटो; पृथ्वीसोबत काढला झकास सेल्फी!

इंटरनेटशी कनेक्ट असल्यामुळे हा रोबोट डॉग तुमच्या डॉक्टर अपॉइन्मेंट आणि इतर गोष्टीही लक्षात ठेऊ शकतो. हा रोबोट आपल्या मालकासाठी टॅक्सी बोलावू शकतो. यासोबतच हा रोबोट डॉग चक्क क्यूआर कोडदेखील स्कॅन करू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com