Odysseus Earth Selfie : अमेरिकेच्या 'चांद्रयाना'ने अंतराळातून पाठवला फोटो; पृथ्वीसोबत काढला झकास सेल्फी!

US Private Moon Lander : ओडिसियस नावाच्या या यानाचं प्रक्षेपण 15 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं. यासाठी फाल्कन-9 या रॉकेटचा वापर करण्यात आला.
IM-1 Mission
IM-1 MissioneSakal

Odysseus moon lander Selfie with Earth : अमेरिकेतील एका खासगी कंपनीने तब्बल 52 वर्षांनंतर एक मून लँडर (Moon Lander) प्रक्षेपित केलं आहे. हे यान सध्या चंद्राच्या दिशेने प्रवास करत असून, त्याने अंतराळातून पहिला फोटो पाठवला आहे. Odysseus नावाच्या या यानाने पृथ्वीसोबत सेल्फी टिपले आहेत. या फोटोंमध्ये आपला ग्रह अतिशय सुंदर दिसत आहे.

ओडिसियस नावाच्या या यानाचं (US Private Moon Lander) प्रक्षेपण 15 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं. यासाठी फाल्कन-9 या रॉकेटचा वापर करण्यात आला. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था - नासाच्या कमर्शिअल लूनार पेलोड सर्व्हिस प्रोग्राम (CLPS) अंतर्गत ही मोहीम राबवण्यात येत आहे. 22 फेब्रुवारी रोजी हे यान चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.

इंट्यूसिव्ह मशीन्स (IM) नावाच्या कंपनीने हे मून लँडर बनवलं आहे. यासाठी नासा आणि आयएममध्ये 118 मिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे 979.52 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा करार झाला होता. या IM-1 Mission मध्ये सहा खासगी कंपन्यांचे पेलोड्स देखील चंद्रावर पाठवण्यात येत आहेत. ही एकूण 16 दिवसांची मोहीम असणार आहे. चंद्रावर लँड झाल्यानंतर सुमारे 7 दिवस ओडिसियस कार्यरत राहील.

IM-1 Mission
India Spy Satellite : भारताचा पहिला खासगी हेरगिरी उपग्रह लाँचसाठी सज्ज; 'टाटा'ने केली निर्मिती, 'स्पेस-एक्स' करणार प्रक्षेपण - रिपोर्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com