आता रोबोट देणार बातम्या

पीटीआय
Thursday, 19 January 2017

बिजींग - टेक्नॉलॉजीमध्ये रोज नवनवीन प्रयोग होत असतात. पत्रकारितेच्या जगातही टेक्नॉलॉजीने आता नवीन पाऊल टाकले आहे. 'चायना डेली' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, 300 कॅरेक्टर असलेला एक लेख रोबोटकडून लिहून घेण्यात आला असून, रोबोटच्या नावासह तो लेख प्रकाशित देखील करण्यात आला आहे. हा लेख लिहिण्यासाठी या रोबोटला काही सेकंदांचाच वेळ लागल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. 

'झिआओ नान' असे या रोबोटचे नाव आहे. पेकिंग विद्यापिठातील प्राध्यापक वॅन जोजंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रोबोट मोठे अहवाल तसेच छोट्या बातम्या लिहिण्यासाठी देखील सक्षम आहे. 

या रोबोटची चाचणी केली असता, कार्यालयातील कर्मचाऱ्यांपेक्षा रोबोटची 'डेटा ऍनालिसिस' करण्याची आणि कमी वेळात जास्त शब्द लिहिण्याची क्षमता चांगली असल्याचे लक्षात आले आहे. परंतु, असे असले तरी एवढ्यात असे रोबोट्स पत्रकारांची जागा घेऊ शकतील असे म्हणता येणार नाही, असे मत जोजंग यांनी व्यक्त केले आहे.  

सध्या हा रोबोट प्रत्यक्ष मुलाखत देखील घेऊ शकतो. परंतु, या मुलाखती दरम्यानचे जोड प्रश्न समजणे, किंवा वक्याचा मतितार्थ समजणे अशा गोष्टी रोबोट करु शकत नाही. त्यामुळे मुलाखतीमधील नेमकी 'बातमी' ओळखणे त्याला शक्य होत नसल्याचे जोजंग यांनी म्हटले आहे. 

असे रोबोट पूर्णपणे मानवाला पार्याय होऊ शकतील की नाही याबाबत शंका आहे. परंतु, वृत्तपत्रातील कर्मचाऱ्यांना, संपादकांना त्याचा चांगला उपयोग नक्कीच करता येईल असे मत जोगंग यांनी मांडले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robot reporter gets its first news article published