कोरोना काळात Rolls-Royce ची विक्रमी विक्री; ११७ वर्षात सर्वाधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना काळात Rolls-Royce ची विक्रमी विक्री; ११७ वर्षात सर्वाधिक
कोरोना काळात Rolls-Royce ची विक्रमी विक्री; ११७ वर्षात सर्वाधिक

कोरोना काळात Rolls-Royce ची विक्रमी विक्री; ११७ वर्षात सर्वाधिक

ब्रिटनच्या रोल्स-रॉईस (Rolls-Royce) मोटर कार्सची कोरोना काळात विक्रमी विक्री झाली. अमेरिका, आशिया-पॅसिफिक आणि ग्रेटर चायना, तसेच जगभरातील अनेक देशांमध्ये विक्री जवळपास 50 टक्क्यांनी वाढून 5,586 कारपर्यंत पोहोचली आहे, असे कंपनीने सोमवारी सांगितले. नवीन 'घोस्ट' कूप आणि 2.6-टन, 350,000-युरो Cullinan SUV ला मागणी जास्त होती.

2021 हे रोल्स-रॉइस मोटर कारसाठी एक महत्वाचे तसेच अभूतपूर्व वर्ष होते," असे रोल्स-रॉइस मोटर कार्सचे मुख्य कार्यकारी टॉर्स्टन मुलर-ओटवोस यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: Rolls-Royce ची तब्बल 202 कोटींची जगातील सर्वात महागडी कार

आम्ही 117 वर्षांच्या इतिहासात मार्केटमध्ये प्रत्येक जागतिक बाजारपेठेतील सर्व उत्पादनांना अभूतपूर्व मागणी असलेल्या कोणत्याही वेळेपेक्षा जास्त कार वितरित केल्या, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, Rolls-Royce, Spectre ही पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. सोसायटी ऑफ मोटर मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्सच्या म्हणण्यानुसार, ब्रिटनच्या मुख्यतः परदेशी मालकीच्या वाहन उत्पादकांनी 2021 मध्ये 1.65 दशलक्ष वाहनांची निर्मिती केली. 2020 च्या तुलनेत ते फक्त एक टक्क्यांनी वाढले होते. पण, 2019 मधील कोरोना महामारीच्या आधीपेक्षा हे जवळजवळ 29 टक्क्यांनी कमी आहे.

2020 च्या सुरुवातीस कोरोनाचा उद्रेक झाला आणि थोडा काळ मागणीत घट झाली. पण आता लोकांनी परत खरेदी करायला सुरूवात केली आहे. पण, संगणक चिप्सच्या जगभरातील कमतरतेमुळे उत्पादन थांबले आहे.

हेही वाचा: विज्ञानाचा चमत्कार! मानवी शरीरात डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top