जगातील सर्वात महागडी कार (Most Expensive Car in the World)-
जगभरात अनेक अलिशान आणि महागड्या आहेत. परंतु तरीही कार विश्वात रॉल्स रॉयसचा प्रचंड दबदबा आहे. जगातील सर्वोत्तम अशा अलिशान, सुरक्षित आणि स्टायलीश कार बनवण्यासाठी रॉल्स रॉयस (Rolls-Royce) प्रसिद्ध आहे. जगभरात स्टेटस सिम्बॉल म्हणून बनून राहिलेल्या या कार अतिशय महागड्याही असतात. आज आपण रोल्स रॉयसची (Rolls-Royce) बोट टेल (Boat Tail) ही जगातील सर्वात महाग कार आहे. आज आपण तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
1. रोल्स रॉयसची (Rolls-Royce) बोट टेल (Boat Tail) ही कार जगातील सर्वात महागडी कार आहे. बोट टेलची (Boat Tail) किंमत तब्बल 28 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2022 कोटी रुपये आहे.
2. रोल्स रॉयसची ही कार 4 सीट कन्व्हर्टेबल (Convertible) लक्झरी कार आहे.
3. स्वित्झर्लंडची प्रसिद्ध कंपनी House of Bovet कारचे मालक (पती आणि पत्नी) यांच्यासाठी खास बांधण्यात आली आहे.
4. कारमध्ये दुहेरी शॅम्पेन कूलर (Champagne Cooler) विशेषतः कार मालकाची आवडती आर्मान्ड डी ब्रिग्नॅकच्या बाटल्या बसविण्यासाठी डिझाइन केलेले आहे..
5 . रोल्स रॉयस कारचं मॅन्युफॅक्चरींग इतर कार कंपन्यांप्रमाणे पुर्णपणे यंत्रावर होत नाही. अतिशय कुशल कामगारांकडून या कार बनवल्या जातात. फक्त आवश्यक तिथेच यंत्रांची मदत घेतली जाते.
6. कामगारांना कार बनवण्यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच कर्मचारी हवा तितका वेळ घेऊ शकतात. कारमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, यासाठी कंपनी ही काळजी घेते.
7. रोल्स रॉयस कार इतक्या शांत असतात की, जर तुम्ही गाडीच्या आत बसला असाल तर तुम्हाला घड्याळाची टिकटिकही ऐकू येऊ शकते.
8. रोल्स रॉयस कारचे सस्पेन्शन हे जगातील सर्वोत्तम मानले जाते.
9. रोल्स रॉयस कारच्या बोनेटवरील लोगो वैशिष्ट्यपूर्ण असतो.
10. रोल्स रॉयसची (Rolls-Royce) लिमोझिन ही कारसुद्धा जगातील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.