Royal Enfield 1986 Bill : रॉयल इंफील्ड बुलेटची किंमत फक्त 19 हजार! बिल पाहून थक्क झाले लोकं

आज 'राईड ऑफ प्राईड' अशी ओळख असणाऱ्या या बुलेटची किंमत दीड लाखांच्या घरात
Royal Enfield 1986 Bill
Royal Enfield 1986 Bill esakal

Royal Enfield 1986 Bill : काही दिवसांपूर्वी, 1985 चे रेस्टॉरंटचे बिल आणि 1937 चे सायकलचे बिल इंटरनेटवर चर्चेत होते. आता यात भर पडली आहे ती ‘रॉयल ​​इन फील्ड' या बुलेटची.. आणि याने नक्कीच बुलेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आज 'राईड ऑफ प्राईड' अशी ओळख असणाऱ्या या बुलेटची किंमत दीड लाखांच्या घरात आहे.

Royal Enfield 1986 Bill
Maharashtra Karnataka Border : या पहिलवानाने स्वीकारलेलं बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिलं हौताम्य

पण एक काळ असा होता जेव्हा याच बुलेटची किंमत ही फक्त 19 हजार होती. हे बिल आहे 1986 च, ज्यामध्ये बुलेट 350cc ची किंमत फक्त 18,700 रुपये आहे. बिलाचा हा फोटो 13 डिसेंबर रोजी royalenfield_4567k या इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – 1986 मध्ये रॉयल इन फील्ड 350cc. या पोस्टला आतापर्यंत 22 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Royal Enfield 1986 Bill
Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

एका व्यक्तीने लिहिल्याप्रमाणे - आता रिम्स इतके येतात. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, माझ्या बाईकला एका महिन्यासाठी एवढं पेट्रोल लागतं. तिसर्‍याने लिहिल की आज हा बुलेटचा फक्त एका महिन्याचा हप्ता आहे. या हे बिल 23 जानेवारी 1986 चे आहे, जे सध्या कोठारी मार्केट, झारखंड येथे असलेल्या अधिकृत डीलरचे आहे. बिलानुसार, त्यावेळी 350 सीसी बुलेट मोटरसायकलची ऑन-रोड किंमत 18,800 रुपये होती, जी सूट मिळाल्यानंतर 18,700 रुपयांना विकली गेली. याधीही सोशल मिडियावर असे बिल शेयर झाले होते..

Royal Enfield 1986 Bill
Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

- जेव्हा सायकलचे बिल व्हायरल झाले

फेसबुक यूजर संजय खरे यांनी 27 नोव्हेंबर रोजी सायकलच्या बिलाचा फोटो शेअर केलेला आणि लिहिले- एकेकाळी 'सायकल' हे माझ्या आजोबांचे स्वप्न होतं.. सायकलच्या चाकाप्रमाणे काळाचे चाक किती फिरले आहे! हे 88 वर्षांचे बिल एका सायकल स्टोअरचे आहे, ज्यावर दुकानाचे नाव 'कुमुद सायकल वर्क्स' आणि पत्ता कोलकाता आहे. यामध्ये सायकलची किंमत फक्त 18 रुपये आहे.

Royal Enfield 1986 Bill
Mens Bracelets Fashion : मुलींमध्ये सर्वात जास्त चर्चा असलेले मेन्स ब्रेसलेट!

- 1985 चे हे रेस्टॉरंट बिल आठवते?

12 ऑगस्ट 2013 रोजी लाझीज रेस्टॉरंट अँड हॉटेल या फेसबुक पेजने त्यांच्या एका बिलाचा फोटो शेयर केलेला. हे पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल झाले होते. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बिलाची तारीख 20 डिसेंबर 1985 आहे, ज्यामध्ये शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटीचे रेट लिहिले आहेत. त्यावेळी शाही पनीर अवघ्या आठ रुपयांना, दाल मखनी आणि रायता पाच रुपयांना मिळत होते. तर एका रोटीची किंमत 70 पैसे होती. एकूणच, हे संपूर्ण बिल 26 रुपये 30 पैसे आहे, ज्यामध्ये 2 रुपये सेवा शुल्क देखील समाविष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com