लडाखच्या रस्त्यावर बुलेटने अचानक घेतला पेट, अन् पुढं... | Royal Enfield | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bike

Royal Enfield: लडाखच्या रस्त्यावर बुलेटने अचानक घेतला पेट, अन् पुढं...

Royal Enfield Bullet catches fire: बाईक आणि स्कूटरला आग लागल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. गाडी चालवताना अचानक आग लागल्याचे अनेक व्हीडिओ समोर येत असतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये लडाखला गेलेल्या एका व्यक्तीच्या रॉयल एनफील्ड बाईकला अचानक आग लागल्याचे दिसत आहे.

@trippyyogi669 या युट्यूब चॅनेलवर गाडीला आग लागल्याचा व्हीडिओ अपलोड करण्यात आला आहे. व्हीडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रॉयल एनफील्डला अचानक आग लागते. बुलेट आपोआप सुरू होते व अचानक बाजुला उभ्या असलेल्या Royal Enfield Himalayan बाईकवर पडते. यानंतर गाडीने आपोआप पेट घेतल्याचे पाहायला मिळते. तेथे उभे असलेले लोकं पाणी आणि वाळू टाकून आग आटोक्यात आणण्याचा देखील प्रयत्न करतात.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

पँगोंग सरोवराजवळ घडली घडना

व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या लोकेशनवरून लक्षात येते की, रॉयल एनफील्ड बुलेटला आग लागल्याची घटना नुब्रा घाट आणि पँगोंग सरोवर येथे घडली आहे. बुलेटच्या इलेक्ट्रिक तारांमध्ये शॉर्ट-सर्किट झाल्याने इलेक्क्ट्रिक स्टार्टर आपोआप सुरू होते व यामुळे आग लागते. तसेच, वॉटर क्रॉसिंगवरून जाताना बुलेटच्या इलेक्ट्रिक सिस्टममध्ये पाणी घुसल्याने अशी घटना घडली असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेत कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही.

हेही वाचा: TVS Bike: अवघ्या ७ हजारात तुमची होईल 'ही' शानदार बाईक, माइलेज खूपच जबरदस्त

याआधीही घडली आहे अशी घटना

रॉयल एनफील्डच्या बाईकला आग लागल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी देखील अचानक बाईकने पेट घेतल्याचे व्हीडिओ समोर आले आहे. इलेक्ट्रिक सिस्टममधील वायरिंगमुळे अशा घटना घडत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Smartphone Offer: विश्वास बसणार नाही! फक्त ९४९ रुपयात मिळतोय ६जीबी रॅमसह येणारा फोन, पाहा डिटेल्स

टॅग्स :BikeAutomobile