TVS Bike: अवघ्या ७ हजारात तुमची होईल 'ही' शानदार बाईक, माइलेज खूपच जबरदस्त

जबरदस्त माइलेज देणारी TVS Star City बाईक खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. बाईकला ७ हजार रुपये देऊन घरी घेऊन जाऊ शकता.
TVS Bike
TVS BikeSakal

Offer On TVS Star City Plus Bike: जबरदस्त माइलेज देणाऱ्या अनेक चांगल्या बाईक्स बाजारात उपलब्ध आहेत. यापैकीच एक TVS Star City आहे. कमी किंमतीत येणारी ही बाईक जबरदस्त माइलेज देते. तुम्हाला जर TVS च्या बाईक्स आवडत असतील, तर या बाईकचा नक्कीच विचार करू शकता. अवघ्या ७ हजार रुपयात बाईकला घरी घेऊन जाऊ शकता. TVS Star City च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

TVS Star City Plus ची किंमत

TVS Star City Plus बाईक इलेक्ट्रिक स्टार्ट आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या बाईकची सुरुवाती किंमत ७८,१४० रुपये आहे. तर ऑन रो़ड किंमत ९३,८५७ रुपये आहे. तुम्ही बाईकला रोख रक्कम देऊन खरेदी करत असल्यास ९४ हजार रुपये खर्च करावे लागतील. मात्र, तुमचे एवढे बजेट नसल्यास फक्त ७ हजार रुपये देऊन बाईकला घरी घेऊन जाऊ शकता.

तुम्ही ७ हजार रुपये डाउन पेमेंट करून बाईकला खरेदी करू शकता. या डाउन पेमेंटवर बँक तुम्हाला ८६,८५७ रुपये कर्ज देईल. त्यानंतर तुम्हाला दरमहिन्याला २,७९० रुपये ईएमआय भरावा लागेल.

TVS Bike
Top Companies: महिलांना काम करण्यासाठी बेस्ट आहेत 'या' टॉप-१० कंपन्या, पाहा लिस्ट

TVS Star City Plus चे स्पेसिफिकेशन्स

TVS च्या या बाईकमध्ये १०९.७ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८.१९ पीएस पॉवर आणि ८.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन ४ स्पीड गियरबॉक्ससह येते. कंपनीचा दावा आहे की स्टार सिटी प्लस प्रती लीटर ८३.०९ किमीचे माइलेज देते. याव्यतिरिक्त बाईकमध्ये अनेक शानदार फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Smart TV Offer: भन्नाट ऑफर! ५५ इंच स्मार्ट टीव्ही चक्क अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, पाहा डिटेल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com