Royal Enfield Electrik01 : रॉयल एनफिल्ड घेऊन येतेय इलेक्ट्रिक बाईक, जाणून घ्या डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

royal enfield electrik 01 first electric bike image leaked know expected features

Royal Enfield Electrik01 : रॉयल एनफिल्ड घेऊन येतेय इलेक्ट्रिक बाईक, जाणून घ्या डिटेल्स

आयकॉनिक बुलेटची निर्माती करणारा रॉयल एनफिल्ड आता इलेक्ट्रिक बाइक बनवण्याच्या मार्गावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी नवीन इलेक्ट्रिक बाइकवर काम करत असून कंपनीने याचे नाव इलेक्ट्रिक01 ठेवले आहे. या Royal Enfield च्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये काय खास असेल ते जाणून घेऊया.

येतेय इलेक्ट्रिक 01

ही इलेक्ट्रिक बाइक येत्या काही महिन्यांत Royal Enfield कडून सादर केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचा हा प्रकल्प अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. काही काळापूर्वी, कंपनीकडून असेही संकेत मिळाले होते की रॉयल एनफिल्ड आगामी काळात इलेक्ट्रिक बाइक देखील सादर करेल.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

हेही वाचा: Suryakumar Yadav : बाबर अझमला देखील SKY चे वर्चस्व मान्य; फोटो ट्विट करत म्हणाला…

डिझाईन कसे असेल?

सोशल मीडियावर इलेक्ट्रिक एनफिल्डचे फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाईकची झलक दाखवण्यात आली आहे. फोटोनुसार बाईकच्या पुढील भागात गर्डरसारखे सस्पेन्शन दिले जाऊ शकते. सामान्य बाईक प्रमाणे, यात देखील टाकीवर रॉयल एनफिल्ड बॅजिंग असेल. याशिवाय बाइकच्या फ्रेमवर बाईकचे नाव इलेक्ट्रिक 01 लिहिलेले असेल.

बुलेट त्याच्या वर्तुळाकार हेडलॅम्पद्वारे ओळखली जाते. जे या बाईकमध्येही मिळेल. यासोबतच इलेक्ट्रिक रॉयल एनफिल्डमधील काही भाग सामान्य बाईकप्रमाणे राहू शकतात. मात्र, बाईकबाबत फारच कमी माहिती समोर आली असून भविष्यात लवकरच याबद्दल अधिकची माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे. व्हायरल झालेल्या फोटोच्या तुलनेत प्रोडक्शन रेडी बाइकपर्यंतच्या प्रवासात यामध्ये बरेच बदल होऊ शकतात.

हेही वाचा: Shraddha Murder Case: श्रद्धाचे आडनाव वालकर म्हणून की तो…; भाजपचे 'मविआ'वर गंभीर आरोप

कधी पर्यंत लॉंच होईल?

काही मिडीया रिपोर्टनुसार, इलेक्ट्रिक एनफिल्डचा प्रोजेक्ट अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. आणि त्यानंतर बाइक लॉन्च होईपर्यंत अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. अनेक टप्पे पार केल्यानंतरच बाइक बाजारात आणली जाते. अशा परिस्थितीत ही इलेक्ट्रिक बाईक पुढील वर्षाच्या मध्यात किंवा अखेरीस बाजारात आणली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Automobile