Royal Enfield चे चालकांना वेड; आकडेवारी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Royal Enfield

Royal Enfield चे चालकांना वेड; आकडेवारी जाहीर

डिसेंबर महिन्यातील दुचाकी विक्रीचे आकडे जाहीर झाले आहेत. हिरो मोटोकॉर्प आणि टीवीएस मोटरपेक्षा रॉयल एनफिल्डची विक्री चांगली झाली आहे. आयशर मोटर्सचे युनिट असलेल्या रॉयल एनफिल्डची एकूण मोटरसायकल विक्री डिसेंबर २०२१मध्ये सात टक्क्यांनी वाढून ७३,७३९ युनिट्स झाली. डिसेंबर २०२० मध्ये कंपनीने ६८,९९५ वाहनांची विक्री केली. देशांतर्गत बाजारात कंपनीची विक्री किरकोळ घसरून ६५,१८७ युनिट्स झाली. डिसेंबर २०२० मध्ये ते ६५,४९२ युनिट होते. समीक्षाधीन महिन्यात कंपनीची निर्यात ३,५०३ युनिट्सवरून ८,५५२ युनिट्सपर्यंत वाढली आहे.

टीव्हीएस मोटरची विक्री घटली

चेन्नईस्थित टीव्हीएस मोटर कंपनीची एकूण विक्री डिसेंबर २०२१ मध्ये आठ टक्क्यांनी घसरून २,५०,९३३ युनिट झाली. टीव्हीएस मोटरने एका निवेदनात म्हटले आहे की, २०२० च्या याच महिन्यात कंपनीने एकूण २,७२,०८४ युनिट्सची विक्री केली आहे. डिसेंबर २०२० मध्ये २,५८,२३९ युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात एकूण टू-व्हीलर विक्री २,३५,३९२ युनिट्स होती. त्यात ९ टक्क्यांनी घट झाली.

हिरो मोटोकॉर्प च्या विक्रीत १२ टक्क्यांनी घट

देशातील सर्वांत मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पची एकूण विक्री डिसेंबर २०२१ मध्ये १२ टक्क्यांनी घसरून ३,९४,७७३ युनिट्सवर आली आहे. डिसेंबर २०२० मध्ये कंपनीने ४,४७,३३५ वाहनांची विक्री केली. कंपनीने सांगितले की, देशांतर्गत बाजारात तिची विक्री डिसेंबर २०२० मध्ये ४,२५,०३३ युनिट्सच्या तुलनेत ३,७४,४८५ युनिट्सवर घसरली आहे. कंपनीने म्हटले आहे की ते यावर्षी मार्चमध्ये आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन अनावरण करण्याची तयारी करत आहे.

हेही वाचा: कोरोना वाढतोय, शाळांबाबत निर्णय नाहीच; सीबीएसई शाळा उद्यापासून

ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या विक्रीत वाढ

ग्रीव्हज कॉटनच्या ई-वाहन युनिट ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीने डिसेंबर २०२१ मध्ये १०,००० इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. या कालावधीत त्यांच्या ई-थ्री-व्हीलर विक्रीत १०१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर मार्केटमध्ये ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीचे स्थान मजबूत आहे. डिसेंबर २०२० च्या तुलनेत डिसेंबर २०२१ मध्ये अँपिअर (ई-स्कूटर) च्या महसुलात सहा पटीने वाढ झाली आहे. तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा व्यवसाय १०१ टक्क्यांनी वाढला आहे.

Web Title: Royal Enfield Sales Increased Bike Lover Statistics Released

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bikes
go to top