कोरोना वाढतोय, शाळांबाबत निर्णय नाहीच; सीबीएसई शाळा उद्यापासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

कोरोना वाढतोय, शाळांबाबत निर्णय नाहीच; सीबीएसई शाळा उद्यापासून

नागपूर : राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचे (omicron variant) संक्रमण आणि कोरोनाच्या रुग्णसंख्येतही (coronavirus) लक्षणिय वाढ होत आहे. असे असताना अद्याप राज्य आणि स्थानिक प्रशासनाने कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे काय? याबाबत पालकांमध्ये मोठा संभ्रम आहे. याशिवाय उद्यापासून सीबीएसई शाळांच्या ख्रिसमसच्या सुट्या संपत असल्याने शाळेत मुले येतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (No decision about schools)

राज्य सरकारने दिलेल्या निर्णयानुसार, १५ जुलैला ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वीचे वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्यात आल्यात. २० ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील ५ वी ते ८ वी व शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या. १ डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. परंतु, शहरी भागातील शाळांचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडला.

हेही वाचा: मिस युनिव्हर्स हरनाझ संधूचा महागडा ड्रेस बघितला का?

अखेर १५ डिसेंबरला नागपूर मनपा हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय आयुक्तांनी जारी केला. त्यानुसार ५० टक्के उपस्थितीसह शाळा व महाविद्यालये सुरू आहेत. दरम्यान, ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे सीबीएसई शाळा बंद होत्या. मात्र, या आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्या शहरात ३५० च्या वर गेली आहे. जिल्ह्यात हा आकडा ४०६ इतका आहे. त्यामुळे पालकांमध्ये आता भीती निर्माण झालेली आहे. त्यातूनच आता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालक संभ्रमात आहेत.

महापालिकेच्या ३३ शाळांमध्ये लसीकरण

शहरातील ३३ महापालिकेच्या शाळांमध्ये प्रशासनाकडून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेतील शाळा यामुळे बंद राहणार आहे. मात्र, अद्यापही चिमुकल्यांसह युवकांचे लसीकरण झालेले नाही. याशिवाय शहरातील रुग्णांची आकडेवारी वाढत असल्याने विद्यार्थ्यांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: दिल्लीतील खुनाचा छडा; दिव्यांगच निघाला आरोपी; दोघांना अटक

शाळाच ठरतील हॉटस्पॉट

गेल्या आठवड्याभरापासून शहरासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. याशिवाय ‘ओमिक्रॉन’चा कम्युनिटी स्प्रेड झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, अशावेळी लवकरात लवकर शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप याबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. यातच शाळा आणि महाविद्यालये ५० टक्के उपस्थितीसह सुरू आहेत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये कोरोनाची हॉटस्पॉट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्राथमिक शाळा

  • मनपा हद्दीतील शाळा - ११५९

  • खासगी शाळा - १०५३

  • मनपाच्या शाळा - ११६

माध्यमिक शाळा

  • शहर - ५६७ शाळा,

  • १७८ - कनिष्ठ महाविद्यालये

  • जिल्हा परिषद -१,५३०

  • कनिष्ठ महाविद्यालये - २४०

महाविद्यालये - १९०

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top