Fantasy Cricket म्हणजे काय? गेम खेळण्यासाठी जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

Rules and Important tips to play Fantasy Cricket game
Rules and Important tips to play Fantasy Cricket game

भारत हा असा देश आहे जिथे क्रिकेट हा खेळ लोकांच्या मनामनात बसला आहे. अगदी परिसरातील लहान गल्लीपासून तर मोठमोठ्या स्टेडियमपर्यंत हा खेळ खेळला जातो. लहान मुलांपासून तर थोरामोठ्यांपर्यंत सर्वजण क्रिकेटचे फॅन असतात. मात्र धावपळीच्या आयुष्यात अनेकांना प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्याचा आनंद घेता येत नाही. म्हणूनच भारतात अनेक ऑनलाइन फँटसी स्पोर्ट गेम्स उपलब्ध आहेत. मात्र यांमध्येही क्रिकेट हा खेळ खेळणारे लोकं अधिक प्रमाणात आहेत. एका आकडेवारीनुसार, भारतात असणाऱ्या फँटसी स्पोर्ट गेम्समध्ये तब्बल 71 टक्के लोक Play Fantasy Cricket खेळतात तर 54 टक्के लोक फुटबॉल खेळतात. म्हणूनच Fantasy Cricket या ऑनलाइन गेमला भारतातच नाही तर जगभरात अनन्यसाधारण महत्वं आहे. या ऑनलाइन गेममध्ये खेळणारा व्यक्ती जगभरातील कुठल्याही व्यक्तीबरोबर  संवाद साधू शकतो. पण हा Fantasy Cricket गेम नक्की आहे काय? आणि तो आपण कसा खेळू शकतो त्याबद्दल जाणून घेऊया.

Fantasy Cricket म्हणजे नक्की काय?

अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर Fantasy Cricket हा एक ऑनलाइन स्पोर्ट्स गेम आहे. या गेममधे तुम्ही स्वतःची वर्चुअल क्रिकेट टीम तयार करू शकता. ही टीम तुम्हाला 25-30 खेळाडूंपैकी 11 खेळाडूंची निवड करून तयार करता येऊ शकते. इतकंच नाही तर हा गेम ऑनलाइन असल्यामुळे तुम्हाला तुमच्या टीममध्ये आताच्या मॅचमध्ये असणारे काही खेळाडू निवडता येतील. हा गेम खेळणाऱ्या यूजर्सना ODI, T20 आणि इतर लीग मॅच खेळता येऊ शकतात. विशेष म्हणजे जर खऱ्या मॅचमध्ये एखाद्या खेळाडूनं चांगली कामगिरी केली आणि जर तुम्ही निवडलेल्या टीममध्ये तो खेळाडू असेल तर तुम्हाला पॉईंट्स मिळतील. तसंच कॅच पकडली, विकेट घेतली, रन्स घेतले की तुम्हाला पॉईंट्स मिळणार आहेत. Fantasy Cricket हा जरी एक ऑनलाइन गेम असला तरी खेळताना असं काही वातावरण तयार होईल की तुम्हाला प्रत्यक्ष स्टेडियममध्ये खेळल्याचा आनंद मिळेल.

असं डाउनलोड करा अप्लिकेशन

Fantasy Cricket हा गेम खेळण्यासाठी तुम्हाला आधी प्ले स्टोरवरून अप्लिकेशन डाउनलोड करणं आवश्यक असणार आहे. अप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला यात तुमचं अकाउंट तयार करावं लागेल. यानंतर तुम्हाला येणाऱ्या आणि आता सुरु असलेल्या काही मॅच सर्च करून तुमच्या आवडत्या मॅचमध्ये रजिस्टर करावं लागेल. यानंतर तुम्हाला मॅच खेळता येईल आणि तुमच्या विरोधी टीमला पराभूत करण्याची संधी मिळेल. मात्र जर तुम्हाला या गेममध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला तुमच्यातील संयम आणि गुणांचा वापर करावा लागेल. यासाठी या गेमच्या तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स माहिती असणं आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. Fantasy Cricket खेळताना या ट्रिक्स वापरून बघा -

खेळाडूंच्या आताच्या कामगिरीकडे आणि फॉर्मकडे लक्ष द्या

जर तुम्हाला तुमची 11 खेळाडूंची टीम अधिक प्रभावी बनवायची असेल तर तुम्हाला प्रत्येक खेळाडूच्या आताच्या कामगिरीकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. Fantasy Cricket हा जरी ऑनलाईन गेम असला तरी त्यात तुम्ही निवडलेले खेळाडू हे खऱ्या मॅचमध्ये खेळतात. जर खऱ्या मॅचमध्ये खेळाडूची कामगिरी आणि फॉर्म चांगला असला तरच तुम्हाला पॉईंट्स मिळतात. त्यामुळे कोणत्या खेळाडूंचा फॉर्म चांगला आहे आणि कोणता खेळाडू कमजोर आहे यावर सतत लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. जर तुमचं लक्ष असेल तर तुमच्या टीममध्ये तुम्ही फक्त आणि फक्त चांगलेच खेळाडू निवडू शकता. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या पॉइंट्समध्ये वाढ होऊ शकते. 

परिपूर्ण टीम तयार करा

खेळाडूंच्या फॉर्मकडे लक्ष ठेवण्यासोबतच तुम्हाला एक परिपूर्ण टीम तयार करणं महत्वाचं आहे. मॅच जिंकण्यासाठी तुमच्या टीममध्ये बॅट्समन, बॉलर्स, उत्तम फिल्डर्स आणि ऑलराउंडर्स निवडण्याची गरज आहे. यामुळे तुम्हाला बॅटिंग, बॉलिंग तसंच फिल्डिंगच्या वेळीसुद्धा पॉईंट्स मिळू शकतील.  

टीमची निवड करताना पीच रिपोर्ट बघा

टीममधील खेळाडूंची निवड करण्याआधी त्या दिवशीच्या मॅचमधील पीच कशी आहे हे बघून घ्या. यासाठी तुम्हाला पीच रिपोर्ट बघणं महत्वाचं असेल. याच प्रमुख कारण म्हणजे अनेकदा पीचवर गावात असल्यामुळे सीम किंवा फास्ट बॉलर्सना मदत मिळते तर पीच ड्राय असेल तर बॅटिंगसाठी उत्तम असते. मात्र अशावेळी तुमच्या टीममध्ये उत्तम बॉलर्स किंवा बॅट्समन नसतील तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. म्हणूनच पीच रिपोर्ट बघणं अतिशय महत्वाचं आहे. यानुसार तुम्ही टीममध्ये खेळाडू घेऊ शकता.

हवामानाचा अंदाज घ्या

तुम्ही जरी ऑनलाईन गेम खेळत असाल तरी मॅचमध्ये हवामानावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या पॉईंट्सवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुमच्या टीममधील खेळाडू निवडताना त्यादिवशीच्या हवामानाचा अंदाज घ्या. पाऊस आल्यामुळे DRS घ्यावा लागला तर तुमच्या टीममध्ये बॉलर्स आणि बॅट्समन चांगले असणं महत्वाचं आहे. त्यामुळे नेहमी हवामानाचा अंदाज घेऊनच टीमची निवड करा.

टीममध्ये योग्य कर्णधार आणि उपकर्णधार निवडणं महत्वाचं

कुठल्याही टीमच्या उत्तम कामगिरीसाठी खेळाडूंसोबतच त्या टीमचा कर्णधारही कारणीभूत असतो. त्यामुळे टीम तयार करताना योग्य कर्णधार आणि उपकर्णधार निवडणं महत्वाचं आहे. कारण याचा परिणाम तुमच्या पॉईंट्सवर होऊ शकतो. गेम खेळताना जर तुमचा कर्णधार चांगली कामगिरी करू शकला नाही तर तुमचे पॉईंट्स दुपटीनं कमी होतील. तसंच उपकर्णधाराची कामगिरी चांगली नसेल तर तुमचे पॉईंट्स दीड पटीनं कमी होतील. म्हणूनच या दोन्ही जागांसाठी उत्तम खेळाडू निवडणंच फायदेशीर ठरेल. 

एकपेक्षा अधिक टीम्स तयार करा

आयुष्यात जिंकायचं असेल तर पर्याय असणं खूप महत्वाचं आहे. इथेही हाच नियम लागू होतो. जर तुम्हाला तुमचे पॉइंट्स न गमावता जिंकायचं असेल सर्वात महत्वाची ट्रीक म्हणजे एकपेक्षा अधिक टीम तयार करणं. या गेममधे तुम्ही तुम्ही कुठलेही 6 खेळाडू कोर मेम्बर ठेऊन इतर खेळाडूंना बदलून वेगळी टीम तयार करू शकता. तसंच निरनिराळे खेळाडू घेऊन तुम्ही टीम तयार करू शकता.  प्रत्येक टीममध्ये कर्णधार आणि उपकर्णधारही बदलू शकता. एकपेक्षा अधिक टीम्स तयार केल्यामुळे तुम्हाला अनेक मॅचमध्ये सहभागी होता येईल आणि अधिक पॉईंट्स कमवता येतील.

टॉस ठरवणार भविष्य

टॉस जिंका आणि मॅच जिंका असं म्हणतात. तसंच तुमच्या शत्रूला कधीही कमजोर समजू नका असंही म्हणतात. त्यामुळे टॉसवर नेहमी लक्ष ठेवा. टॉसनंतर तुमच्या विरोधी टीममध्ये कोणते खेळाडू आहेत बघा आणि त्यानुसार आपल्या टीममध्ये खेळाडू निवडा. तसंच त्यानुसार तुमच्या टीमधील बॅटिंग आणि बॉलिंग लाइनअपमध्ये बदल करा.

भारतात Fantasy Cricket हा गेम लोकप्रिय आहेच. तसंच कोरोनाच्या (COVID-19) लॉकडाउनच्या काळात Fantasy Cricket हा गेम लाखो लोकांर्पर्यंत पोहोचला आणि लोकप्रिय झाला. IPL मुळेही या गेमच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. जर तुम्हीही क्रिकेटचे चाहते असाल आणि तुम्हाला घरी बसून ऑनलाईन गेमधून स्टेडियममध्ये खेळण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आज आता ताबडतोब Fantasy Cricket ची अप्लिकेशन तुमच्या स्मार्टफोनमध्ये किंवा टॅबमध्ये डाउनलोड करा आणि घ्या क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com