esakal | Corona Impact - मोबाइल डेटाच्या वापरात शहरी लोकांपेक्षा 'गावकरी' ठरले भारी
sakal

बोलून बातमी शोधा

mobile data.

देशात तंत्रज्ञान होत असलेल्या क्रांतीचा मोठा आणि सर्वात पहिला फायदा शहरी भागातील नागरिकांना होतो.

Corona Impact - मोबाइल डेटाच्या वापरात शहरी लोकांपेक्षा 'गावकरी' ठरले भारी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशात तंत्रज्ञान होत असलेल्या क्रांतीचा मोठा आणि सर्वात पहिला फायदा शहरी भागातील नागरिकांना होतो. यामध्ये ग्रामीण भागाल नेहमी याचा उशीरा फायदा होत असतो. पण कोरोनाकाळात एका बाबतीत ग्रामीण भागाने शहरी भागाला मागे टाकले आहे. कोरोनाकाळात ग्रामीण भागात मोबाईल इंटरनेटचा वापर लक्षणीय वाढल्याचे आढळले आहे. तज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनमध्ये बरेच कामगार गावाकडे गेल्याने ग्रामीण भागातील इंटरनेट वापराचे प्रमाण वाढले आहे. 

ग्रामीण भारतात मोबाईल डेटा वापराचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले-
कोरोनामुळे जवळपास 60 ते 70 टक्के स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परतले होते. यामुळे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत मोबाइल डेटाचा वापर सुमारे 30 टक्क्यांनी वाढला. शहरी लोकसंख्येच्या बाबतीत एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत शहरांमध्ये 15 ते 20 टक्के मोबाइल डेटा वापरला गेला आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या सर्व ऑफर्समुळे हे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

फक्त 50 रुपयांत आधारकार्ड होणार घरपोच

लॉकडाउनंतर इंटरनेटचा वापर वाढला-
लॉकडाऊननंतर ग्रामीण भारतात वायरलेस ब्रॉडबँडचा वापरही वाढल्याचे दिसले आहे. यामुळे ग्रामीण भारतात इंटरनेटचा वापर वाढला. सध्या जर एकूण मोबाइल डेटाबद्दल पाहिलं तर ग्रामीण भारतातील लोकांनी 45 टक्के मोबाइल डेटा वापरला, तर उर्वरित 55 टक्के मोबाइल डेटा शहरांमध्ये वापरला गेला आहे. कोरोनापुर्वी 40 टक्के मोबाइल डेटा ग्रामीण भागांत तर 60 टक्के शहरांत वापरला जात होता.

आता WhatsAppच्या E-wallet वरूनही पाठवता येणार पैसे ; NCPI ने दिली परवानगी

फोनवर बोलणं कमी झालं-
ग्रामीण भारतात मोबाइल डेटाचा वापर वाढला आहे, पण फोनमध्ये बोलण्याच्या प्रमाणात 5 टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. तसेच शहरांतून मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर आपल्या घरी परतले, ज्यामुळे गावातील मोबाइल टॉकचे प्रमाण कमी झाले आहे. आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओसोबत जून ते ऑगस्ट या कालावधीत 27.6 लाख नवीन मोबाईल युजर्स आणि भारती एअरटेलला 14.7 लाख मिळाले आहेत. याबद्दलची बातमी एनबीटीने केली आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image