टेक्नोहंट : ‘मेटावर्स’ची आभासी दुनिया

व्हर्चुअल रिऍलिटी आणि इंटरनेट यांचा तिहेरी संगम म्हणजे ‘मेटावर्स’. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘मेटावर्स’ या आभासी दुनियेने तुम्हाला हव्या त्या विश्वात जगण्याचा अनुभव घेता येईल.
Metaverse
MetaverseSakal

पुढील पाच ते सात वर्षांनंतरचं तुमचं आमचं भविष्य नवतंत्रज्ञानाभोवती गुंफलेलं असेल. तंत्रज्ञान क्षेत्रात दररोजच नवनव्या संकल्पना उदयास येत आहे. सध्याच्या नवतंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रिॲलिटी, ऑगमेंटेड रिॲलिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या ‘आयुधां’चा वापर करत नवनवे आविष्कार घडत आहे. त्यालाच पुढं नेत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नुकतेच त्यांच्या भविष्यातील संकल्पनांबाबत भाष्य केले. त्यापैकी सर्वांत महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘मेटावर्स’. याच संकल्पनेबद्दल...

वास्तविक परिस्थिती, व्हर्चुअल रिऍलिटी आणि इंटरनेट यांचा तिहेरी संगम म्हणजे ‘मेटावर्स’. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘मेटावर्स’ या आभासी दुनियेने तुम्हाला हव्या त्या विश्वात जगण्याचा अनुभव घेता येईल. आतापर्यंत व्हिडिओ गेम्स किंवा हॉलिवूडच्या चित्रपटात ‘मेटावर्स’चा वापर झाला आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आली ती १९९२मध्ये. अमेरिकन साय-फाय लेखक नील स्टीफेन्सन यांनी त्यांच्या ‘स्नो क्रॅश’ या कादंबरीत ‘मेटावर्स’बाबत विवेचन केले आहे. त्यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार, आभासी दुनियेत इंटरनेटचा वापर करून निर्माण केलेले विस्मयकारी दुनिया म्हणजे ‘मेटावर्स’ होय. ‘मॅट्रिक्स’ चित्रपटात तुम्हाला त्याची झलक पाहायला मिळाली. ‘मेटावर्स’च्या दुनियेत केवळ तुम्ही विचार करायचा अवधी, ती वस्तू तुमच्या बाजूला प्रत्यक्षात दिसेलही. मार्क झुकरबर्ग म्हणाले, की भविष्यात फेसबुकच्या ‘मेटावर्स’च्या माध्यमातून लोकांना आभासी दुनियेतून फेरफटका मारू शकतील, तसेच कोणत्याही प्रकारचे कामही करू शकणार आहे.

डिसेंट्रलँड या वेबसाइटवर तुम्हाला खास गेमिंगसाठी तुमची पर्सनलाईज्ड आभासी दुनिया तयार करता येते; मात्र सर्वसामान्य पीसी किंवा लॅपटॉपवर त्या वेबसाइट उघडल्याच जात नाही. कारण, त्यासाठी उच्च क्षमतेचे ग्राफिक्स असलेल्या पीसी किंवा लॅपटॉपची आवश्यकता भासते. ‘मेटावर्स’ची आभासी दुनियाच निर्माण करण्यासाठी अधिक उच्च क्षमतेच्या हार्डवेअरचीही आवश्यकता भासेल. दर्जेदार व्हीआर सेटअपही तुमच्याकडे असायला हवे.

कसा होणार वापर?

सध्यातरी काल्पनिक वाटत असलेली ‘मेटावर्स’ची दुनिया ही निश्चितच विस्मयकारी असेल. ‘मेटावर्स’च्या मदतीने तुम्हाला कार्यालयात जाता येईल, मित्र-मैत्रिणींना भेटता येईल, चक्क स्टेडिअमवर जाऊन सामन्याचा आनंदही लुटता येईल. त्यासाठी व्हीआर सेटअपच्या मदतीने तुम्हाला घरात बसून इंटरनेट आणि व्हर्च्युअल रिऍलिटीच्या मदतीनं वरील बाबींचा अनुभव घेता येणार आहे.

एकत्रित संशोधनाची गरज

‘मेटावर्स’ची निर्मिती करणे काही सहजसोपे नाही. सध्या केवळ फेसबुकच ‘मेटावर्स’ची निर्मिती करतंय, असं नव्हे. अनेक टेक कंपन्यांनी ‘मेटावर्स’बाबत त्यांचा मनसुबा व्यक्त केलाय. मायक्रोसॉफ्ट, एनव्हीडीयासह एपिक गेम्सने याबाबत विचारविनिमय सुरू केला आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांनी एकत्र येत त्यांच्याकडील संसाधने, तांत्रिक कौशल्ये शेअर करतील आणि ही आभासी दुनिया निर्माण करण्यासाठी हातभार लावतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com