
फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये बाजारात आतापर्यंत केवळ सॅमसंगचे वर्चस्व होते; मात्र आता ओप्पोनेही फाईंड एन२ फ्लिप हा नवाकोरा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला.
टेक्नोहंट : फोल्डेबलचा नवा स्पर्धक
फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये बाजारात आतापर्यंत केवळ सॅमसंगचे वर्चस्व होते; मात्र आता ओप्पोनेही फाईंड एन२ फ्लिप हा नवाकोरा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला. त्यामुळे ग्राहकांनाही फोल्डेबल सीरिजमध्ये नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. सॅमसंगच्या तुलनेत ओप्पोच्या या स्मार्टफोन काय वेगळेपण आहे, तसेच त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याबाबत...
ओप्पोने हा फाईंड एन२ फ्लिप हा स्मार्टफोन लॉन्च करताना सर्वाधिक प्रमोशन केले, ते बॅक स्क्रीन डिस्प्लेचे. सॅमसंगच्या तुलनेत ओप्पोने या स्मार्टफोनमध्ये ३.२६ इंचांचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. त्यामुळे यावर आलेले कॉल्स, नोटिफिकेशन चेक करण्यासह बॅक कॅमेऱ्याच्या मदतीने अगदी सहजपणे सेल्फी काढता येतात. एरवी मोठ्या डिस्प्लेचा स्मार्टफोन हॅण्डल करताना येणारी अडचणी या फोल्डेबल स्मार्टफोनमुळे आणि बॅकस्क्रीनमुळे दूर होते. तसेच फ्लिप उघडल्यानंतर या स्मार्टफोनचा मुख्य डिस्प्ले ६.८ इंची असून त्यात १२० Hz रिफ्रेशरेट दिला आहे.
या स्मार्टफोनचे आणखी महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ५० एमपी आणि ८ एमपीचा ड्युएल कॅमेरा सेटअप. हा कॅमेरा Sony IMX890 सेन्सर, मॅरीसिलिकॉन एक्स इमेजिंग एनपीयू आणि हॅसेलब्लेडच्या दर्जेदार लेन्सने सुसज्ज आहे. त्याशिवाय ३२ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिलाय. परंतु स्क्रीन फोल्ड केल्यानंतर मुख्य कॅमेरा आणि बॅक स्क्रीनच्या मदतीने दर्जेदार सेल्फी काढता येतात.
रॅम व स्टोरेजबाबत हा स्मार्टफोन सॅमसंगच्या तुलनेत थोडा पिछाडीवर आहे. केवळ ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज सध्याच्या घडीला खूपच कमी म्हणावे लागेल. कदाचित लवकरच ओप्पो अधिक स्टोरेज व्हेरिएंट सादर करेल, ही अपेक्षा. दुसरीकडे या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 हा प्रोसेसर दिला. तसेच 4400 mAh ची दीर्घकाल चालणारी बॅटरी 44W क्षमतेचे चार्जर यामध्ये दिले आहे. या स्मार्टफोनमधील महत्त्वाची बाब म्हणजे फोल्डेबल स्क्रीनमधील हिंजेस (जाईंट्स) दर्जेदार असल्याने ते उघडबंद करताना कुठलाही गॅप दिसत नाही. हा स्मार्टफोन विविध ई-कॉमर्स वेबसाईटवर ८९,९९९ रुपयांना उपलब्ध झाला आहे.
वैशिष्ट्ये
डिस्प्ले : ६.६८ इंच आणि ३.२६ इंच AMOLED 120Hz Display
प्रोसेसर : Mediatek Dimensity 9000+ 5G Processor
रॅम : ८ जीबी
स्टोरेज : २५६ जीबी
रिअर कॅमेरा : ५० एमपी + ८ एमपी
फ्रंट कॅमेरा : ३२ एमपी
बॅटरी : 4400 mAh (44W)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android v13
रंग : ॲस्ट्रल ब्लॅक आणि मूनलाईट पर्पल
किंमत : ८ जीबी+२५६ जीबी : ८९,९९९ रुपये