टेक्नोहंट : रिअलमीचा ‘कूल’ अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GT NEO 3T

दर्जेदार स्मार्टफोन लॉन्च करत बाजारात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या रिअलमीने काही दिवसांपूर्वी रिअलमी जीटी नियो 3 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता.

टेक्नोहंट : रिअलमीचा ‘कूल’ अंदाज

दर्जेदार स्मार्टफोन लॉन्च करत बाजारात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या रिअलमीने काही दिवसांपूर्वी रिअलमी जीटी नियो 3 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्यात स्टेनलेस स्टील व्हेपर कूलिंग सिस्टम आणि 80Wच्या सुपरफास्ट चार्जिंग सुविधेसह नवाकोरा रिअलमी जीटी नियो 3T स्मार्टफोन बाजारात आला आहे.

रिअलमीने जीटी सीरिजमध्ये आतापर्यंत अनेक स्मार्टफोन सादर केले. त्यात रिअलमी जीटी मास्टर एडिशन, रिअलमी जीटी 5G, रिअलमी जीटी नियो 2, रिअलमी जीटी 2, रिअलमी जीटी 2 प्रो, रिअलमी जीटी नियो 3 हे स्मार्टफोन लॉन्च झाला. वरील सर्व स्मार्टफोन मिड-प्रीमियम बजेट सीरिजमध्ये होते. त्यातच आता रिअलमीने खास नव्या फीचरसह रिअलमी जीटी नियो 3T हा नवाकोरा स्मार्टफोन लॉन्च केला.

रिअलमी जीटी निओ 3T या स्मार्टफोनमध्ये वेगवान परफॉर्मन्ससाठी Qualcomm® Snapdragon™ 870 5G प्रोसेसर देण्यात आले आहे. त्यामुळे गेमिंगसाठीही हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरतो आहे. विशेष म्हणजे गेमिंगमुळे स्मार्टफोनमध्ये ओव्हरहिटिंगचा प्रश्न उद्भवू नये म्हणून खास स्टेनलेस स्टील व्हेपर कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच 80W सुपरडार्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी दिल्याने बराच वेळ गेमिंगचा विनासायास अनुभव घेता येतो. ड्युअल सेल सीरिजमुळे ही बॅटरी अवघ्या 12 मिनिटांमध्ये 50 टक्के चार्ज होते.

या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला असून, त्यात F/1.79 अॅपेरचर दिल्याने कमी प्रकाशव्यवस्थेतही चांगले फोटो काढता येतात. 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही तुलनेने चांगला आहे. तसेच हा स्मार्टफोन 6 GB आणि 8 GB अशा दोन रॅम व्हेरियंटमध्ये उपलब्ध असला, तरी अतिरिक्त 5GB डायनामिक रॅम एक्सटर्नल स्टोअरेजमधून वापरता येते. हा स्मार्टफोन तब्बल 194 ग्रॅम असल्याने तो हाताळायला थोडा जड वाटतो. वजन आणखी कमी करता आले असते, तर इन-हॅण्ड फील उत्तम आला असता.

  • डिस्प्ले : 6.62” E4 AMOLED 120Hz Display

  • प्रोसेसर : Qualcomm® Snapdragon™ 870 5G Processor

  • रॅम : 6 GB, 8 GB

  • स्टोरेज : 128 GB, 256 GB

  • रिअर कॅमेरा : 64 MP + 8 MP + 2 MP

  • फ्रंट कॅमेरा : 16 MP

  • बॅटरी : 5000 mAh (80W)

  • ऑपरेटिंग सिस्टिम : अॅण्ड्रॉईड 12

  • रंग : डॅश व्हाइट, ड्रिफ्टिंग येलो आणि शेड ब्लॅक

  • किंमत - 6GB+128GB - 29,999, 8GB+128GB - 31,999, 8GB+256GB - 33,999

Web Title: Rushiraj Tayade Writes Realme Gt Neo 3t Smartphone

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technologymobile