Sam Altman : 'आमचा सॅमवर पूर्ण विश्वास..', अखेर ओपन एआय कंपनीच्या बोर्डावर अल्टमन परतले! चुकीच्या पद्धतीने टाकलं होतं काढून

Open AI Board : "अंतर्गत चौकशीमध्ये असं दिसून आलं आहे, की अल्टमन यांना चुकीच्या पद्धतीने नोकरीवरुन काढण्यात आलं होतं." असं कंपनीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
Sam Altman Open AI Board
Sam Altman Open AI BoardeSakal

Sam Altman returns on Open AI Board : 'चॅटजीपीटी' बनवणाऱ्या ओपन-एआय कंपनीचे संस्थापक सीईओ यांची काही महिन्यांपूर्वी कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर काही दिवसांमध्येच त्यांना सीईओ पदावर पुन्हा घेण्यात आलं होतं. अखेर आता कंपनीच्या बोर्डावर देखील त्यांना परत घेण्यात आलं आहे. सॅम यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

"अंतर्गत चौकशीमध्ये असं दिसून आलं आहे, की अल्टमन (Sam Altman) यांना चुकीच्या पद्धतीने नोकरीवरुन काढण्यात आलं होतं." असं कंपनीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. सॅमसोबतच आणखी तीन सदस्यांना देखील कंपनीने बोर्डावर घेतलं आहे. यामध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे माजी सीईओ सू डेसमंड-हेलमॅन, सोनी एंटरटेन्मेंटचे माजी प्रेसिडेंट निकोल सेलिगमॅन आणि इंस्टाकार्टचे सीईओ फिदजी सिमो यांचा समावेश आहे.

नाट्यमय पद्धतीने हकालपट्टी

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अल्टमन यांना स्वतःच्याच कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं. कंपनी बोर्डातील (Open AI Board) सदस्यांना अल्टमन यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हणत ही कारवाई करण्यात आली होती. सॅम हे बोर्ड मेंबर्सना विश्वासात घेत नाहीत, असा आरोपही करण्यात आला होता. या निर्णयानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

Sam Altman Open AI Board
Sam Altman Net Worth : 'ओपन एआय' कंपनीत नाही एकही शेअर.. मग अब्जाधीश सॅम अल्टमनला कुठून मिळतो पैसा?

सॅम यांना काढून टाकल्यानंतर कंपनीतील कित्येक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला होता. सोबतच कंपनीतील 300 हून अधिक कर्मचाऱ्यांनी देखील सॅम यांना परत घेतलं नाही तर आपण राजीनामा देऊ असं म्हटलं होतं. यानंतर ओपनएआयमध्ये सर्वात मोठी गुतंवणूक असणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने मध्यस्थी करत सॅम यांना ओपन एआयमध्ये (Open AI CEO) परत आणलं होतं. यानंतर कंपनीच्या बोर्ड सदस्यांंमध्ये मोठे बदल करण्यात आले होते. तसंच, सॅम यांच्यावर आरोप करणाऱ्या तीन बोर्ड मेंबर्सची हकालपट्टी करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com