Samsung Mouse : ओव्हर टाईम केला तर माऊस जाईल पळून, सॅमसंगची करामत

ऑफिसमध्ये ओव्हर टाईम करणाऱ्यांसाठी सॅमसंगने एक जबरदस्त माऊस आणला आहे. ओव्हर टाईम केला तर माऊस हातून पळून जाईल.
Samsung Balanced Mouse
Samsung Balanced Mouseesakal

Samsung Balanced Mouse : लोकांनी बॅलंस्ड काम करावे म्हणून सॅमसंगने एक आगळावेगळा अविष्कार केला आहे. हा माऊस लोकांनी ठराविक काळापेक्षा अधिक काम करू नये म्हणून डिझाईन करण्यात आला आहे. हा माऊस कामाच्या वेळात सामान्य माऊस सारखाच काम करतो. पण त्यापेक्षा जास्त वेळ झाल्यास तो डोस्कवरून पळून जातो.

Samsung Balanced Mouse
Tech knowledge : सिमकार्डचा कोपरा कापलेला का असतो ?

ही कोणाची कल्पना नसून सॅमसंगचा हा माऊस नुसता खऱ्या उंदरासारखा पळून जात नाही तर त्याच्यासारखा दिसतोही. हा माऊस एका जाहिरात एजंसीच्या मदतीने बनवण्यात आला आहे.

Samsung Balanced Mouse
Samsung Mobile Review : सॅमसंगचे फोल्डींग फोन घेत असाल तर हा व्हिडीओ पाहा

या माऊसच्या निर्मितीची संकल्पना कोरियामध्ये जन्माला आली. तेथील लोक वेळेत कामावरून निघत नाहीत. त्यामनी बॅलंस्ड आयुष्य जगावे म्हणून ही संकल्पना समोर आल्याचे सॅमसंगच्या कोरिया यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ पोस्टमध्ये सांगण्यात आले होते. लोकांवर आपल्या लांबलेल्या कामांना पूर्ण करण्याचे प्रेशर असते. त्यामुळे ते वेळेत ऑफीस बाहेर पडत नाही.

Samsung Balanced Mouse
Samsung Data Breach : सॅमसंगच्या ग्राहकांची माहिती चोरीला; अलीकडील दुसरी घटना

सॅमसंगने त्या व्हिडिओत सांगितले होते की, त्यांचा हा माऊस ओव्हर वर्किंगच्या समस्येला दूर करेल. हा सामान्य माऊस नसून लोकांना ओव्हर वर्कपासून रोखण्याची क्षमता आहे.

Samsung Balanced Mouse
Samsung Galaxy Z Fold 4, Galaxy Z Flip 4 प्री बुकिंग सुरु

ओव्हर टाईम केले तर हातातून पळून जाईल

ओव्हर टाईम केले तर हातातून पळून जाईल. माऊसच्या खालच्या बाजूने चाकं बाहेर येतात आणि माऊस पळू लागतो. जर तुम्ही पकडायला गेलात तर त्याचा स्पीड एवढा जास्त असतो की, तो हातातच येत नाही. आणि तरीही पकडा गेलाच तर त्याचा वरचा भाग निघून जातो आणि पूर्णपणे उघडून जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com