सॅमसंगने भारतात लॉंच केले २ बजेट स्मार्टफोन, पाहा किंमत अन् फीचर्स

  Galaxy A13
Galaxy A13

सॅमसंगने शुक्रवारी Galaxy A13 आणि Galaxy A23 हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले. यामध्ये तुम्हाला ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6.6-इंचाचा डिस्प्ले पाहायला मिळेल. तुम्हाला Samsung Galaxy A13 आणि Galaxy A23 या दोन्हींमध्ये 5000mAh बॅटरी पाहायला मिळेल. दोन्ही हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सेल क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सॅमसंगचे नवीन स्मार्टफोन कंपनीच्या One UI 4.1 स्किनसह Android 12 वर चालतात, जे कंपनीच्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन मॉडेलवर आधारित आहेत.

Samsung Galaxy A13 आणि Samsung Galaxy A23 दोन्ही सॅमसंग इंडिया वेबसाइटवर लिस्ट केले आहेत. कंपनीने इतर स्टोअर्स जसे की Amazon, Flipkart आणि रिटेल चॅनेलवर उपलब्धतेची घोषणा करणे बाकी आहे.

Galaxy A13 ची किंमत आणि भारतात उपलब्धता

Samsung Galaxy A13 (4GB RAM + 64GB) ची भारतात किंमत 14,999 रुपये आहे, तर 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला ब्लॅक, लाईट ब्लू, ऑरेंज आणि व्हाईट कलर पर्याय पाहायला मिळतील. भारतात Samsung Galaxy A23 (6GB + 128GB) मॉडेलची किंमत 19,499 रुपये असेल, तर 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला ब्लॅक, लाईट ब्लू, ऑरेंज आणि व्हाईट कलरचे पर्याय पाहायला मिळतील.

  Galaxy A13
लॉंच होताच Maruti ही कार ठरतेय हीट; ग्राहकांकडून प्रचंड मागणी

Samsung Galaxy A13 स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A13 मध्ये F/1.8 अपर्चर लेन्ससह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, F/2.2 अपर्चर लेन्ससह 5-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि दोन-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. याच्या मदतीने तुम्ही मॅक्रो आणि डेप्थ फोटोग्राफी करू शकता. या हँडसेटमध्ये तुम्हाला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पाहायला मिळतो.

Samsung Galaxy A13 मध्ये, तुम्हाला 128 GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज पाहायला मिळते, जे microSD कार्ड स्लॉटद्वारे (1 TB पर्यंत) वाढवता येते. स्मार्टफोनवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G, Wi-Fi, Bluetooth v5.0, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. यात 5,000mAh बॅटरी आहे.

  Galaxy A13
प्रतिक्षा संपली! या तारखेला लॉंच होणार OnePlus 10 Pro; वाचा डिटेल्स

Samsung Galaxy A23 चे स्पेसिफिकेशन्स

तुम्हाला Samsung Galaxy A23 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD + 1,080x2,408 pixels) LCD डिस्प्ले आहे. Samsung Galaxy A13 मध्ये f/1.8 अपर्चर लेन्स आणि OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, f/2.2 अपर्चर लेन्ससह 5-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि मॅक्रोसाठी दोन 2-मेगापिक्सेल कॅमेरे दिले आहेत. Samsung Galaxy A23 मध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. हँडसेटमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी सॅमसंगच्या 25W फास्ट चार्जरला सपोर्ट करते.

  Galaxy A13
IPL पाहाण्यासाठी बेस्ट रिचार्ज प्लॅन; मिळतो 3GB पर्यंत डेटा, फ्री Disney+ Hotstar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com