esakal | सॅमसंग Galaxy A52s 5G फोनचा नवीन व्हेरियंट लॉंच! मिळतोय बंपर कॅशबॅक
sakal

बोलून बातमी शोधा

Samsung Galaxy A52s 5G

सॅमसंग Galaxy A52s 5G फोनचा नवीन व्हेरियंट लॉंच! पाहा डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सॅमसंगने त्यांच्या गॅलेक्सी A सीरीजचा स्मार्टफोन Galaxy A52s 5G नवीन कलर व्हेरियंट लाँच केला आहे. या स्मार्टफोनला कंपनीने Awesome Mint कलर व्हेरिएंटमध्ये सादर केले असून हा व्हेरियंट स्पोर्ट्स मॅट बॅक आणि हेज फिनीशसह येतो यासह, फोनच्या मागच्या पॅनेलवर मिनीमल डिझाइन कॅमेरा सेटअप फोनला प्रीमियम लुक देतो.

हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये येतो - 6GB + 128GB आणि 8GB + 128GB. फोनच्या 6 जीबी व्हेरियंटची किंमत 35,999 रुपये असून त्याच्या 8 जीबी रॅम व्हेरियंटसाठी तुम्हाला 37,499 रुपये खर्च करावे लागतील. नवीन लॉन्च झालेला ओएसएम मिंट कलर व्हेरियंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह प्रमुख ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोअरमध्ये 8 जीबी रॅम ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. खास ऑफर अंतर्गत तुम्ही हा सॅमसंग फोन 6,000 रुपयांच्या कॅशबॅकसह देखील खरेदी करू शकता. कॅशबॅकसाठी, तुम्हाला HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी करावी लागेल.

हेही वाचा: नोकियाचा सर्वात स्वस्त 5G फोन Nokia G300 लॉंच, पाहा किंमत

Samsung Galaxy A52s चे स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 6.5-इंच फुल HD + सुपर AMOLED इन्फिनिटी-ओ डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिले जाईल. तर फोनमध्ये प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट मिळेल.

फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा 12-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5-मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आणि 5-मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह यामध्ये 4500mAh ची बॅटरी दिली असून ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 11 वर आधारित One UI 3 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठ तुम्हाला 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS / A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्टसारखे पर्याय फोनमध्ये उपलब्ध आहेत.

हेही वाचा: आधार कार्ड आता स्वतःलाच करता येईल अपडेट, ही आहे सोपी प्रोसेस

loading image
go to top