Galaxy F54 5G : 6000 mAh बॅटरी, 108 मेगापिक्सल कॅमेरा! सॅमसंगने लाँच केला दमदार स्मार्टफोन, पाहा किंमत

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये Exynos 1380 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.
Samsung Galaxy F54 5G
Samsung Galaxy F54 5GEsakal

सॅमसंगने आपल्या गॅलॅक्सी सीरीजमधील पुढचा स्मार्टफोन लाँच केला आहे. F54 5G असं नाव असलेल्या या स्मार्टफोनमध्ये कित्येक तगडे फीचर्स देण्यात आले आहेत. मिड-रेंजमधील हा स्मार्टफोन भारतीय यूजर्सना नक्कीच पसंत पडेल, असा विश्वास सॅमसंगने व्यक्त केला आहे.

फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 या फोनमध्ये 6.7 इंच मोठा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. 12Hz रिफ्रेश रेट असलेला हा डिस्प्ले असणार आहे, ज्यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंगची मजा आणखी वाढणार आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे.

Samsung Galaxy F54 5G
Nothing Phone 2 : नथिंगचा नवीन मोबाईल लाँचसाठी सज्ज, काय असतील फीचर्स?

कॅमेरा

या फोनचा मोठा यूएसपी म्हणजे याचा 108 मेगापिक्सल कॅमेरा. या फोनमध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. यात OIS देण्यात आली आहे, म्हणजेच तुम्ही चालत असताना व्हिडिओ काढले, तरी स्थिर व्हिडिओ रेकॉर्ड होतील.

बाकी दोन कॅमेऱ्यांमध्ये 8 MP क्षमतेचा अल्ट्रा वाईड आणि 2 MP क्षमतेचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी पुढच्या बाजूला 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय.

बॅटरी

या फोनमध्ये 6000mAh क्षमतेची तगडी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. अर्थात, फोनसोबत चार्जर देण्यात येणार नाही. तुम्हाला वेगळा चार्जर विकत घ्यावा लागेल, किंवा तुमच्याकडे असणाऱ्या चार्जरचा वापर करावा लागेल.

Samsung Galaxy F54 5G
DAAM Virus In Mobile : Android युजर्ससाठी नवा धोका, काय आहे DAAM व्हायरस!

किंमत

या फोनचे बेस मॉडेल 27,999 रुपयांना मिळेल. यामध्ये 128 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात येईल. सध्या हा फोन फ्लिपकार्टवर प्री-ऑर्डर करता येत आहे.

प्रोसेसर

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये Exynos 1380 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये अँड्रॉईड 13 ही ओएस असेल. तसेच, पुढील चार वर्षांपर्यंतचे अँड्रॉईड अपडेट्स, तसेच पाच वर्षांपर्यंतचे सिक्युरिटी अपडेट्स सॅमसंग देणार आहे.

Samsung Galaxy F54 5G
Mobile Tips : मोबाईल वापरत वापरत जपा डोळ्यांचं आरोग्य, पाहा टिप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com