Samsung Galaxy M17 5G Launch price features
esakal
विज्ञान-तंत्र
दिवाळीपूर्वीच Samsung ने दिलं मोठं गिफ्ट! आला पॉवरफूल 5G मोबाईल; 5000mAh बॅटरी..50MP कॅमेरा कॉम्बो, किंमत फक्त 12499
Samsung Galaxy M17 5G Smartphone Launch : सॅमसंग गॅलक्सी M17 5G भारतात लाँच झाला असून याबद्दल जाणून घ्या
Galaxy M17 5G Price : सॅमसंगने भारतात आपला नवीन मिडरेंज स्मार्टफोन गॅलक्सी M17 5G लाँच केला आहे, जो 10,000 ते 15,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये उत्कृष्ट फीचर्ससह सादर झाला आहे. या फोनमध्ये सेगमेंटमधील पहिला OIS सक्षम कॅमेरा, सुपर AMOLED डिस्प्ले आणि जास्त वर्षांच्या सॉफ्टवेअर सपोर्टचा समावेश आहे. 13 ऑक्टोबरपासून हा फोन Amazon, Samsung.com आणि निवडक रिटेल स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

