
Samsung New 5G Mobile : सॅमसंगने आपल्या बजेट सेगमेंटमध्ये आणखी एक नवा स्मार्टफोन लॉन्च केला असून, Galaxy M36 5G या नावाने बाजारात धडाक्यात एंट्री घेतली आहे. फक्त 16,499 पासून सुरू होणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त 5000mAh बॅटरी, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि सुपर AMOLED डिस्प्ले यासारखी अनेक आकर्षक फीचर्स आहेत.
3 व्हेरिएंट्स, आकर्षक रंग
Galaxy M36 5G तीन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो
6GB + 128GB – 17,499 रुपये (ऑफरनंतर 16,499)
8GB + 128GB – 18,999 रुपये (ऑफरनंतर 17,999)
8GB + 256GB – 21,999 रुपये (ऑफरनंतर 20,999)
हा स्मार्टफोन Orange Hedge, Siren Green आणि Velvet Black या तीन सुंदर रंगांमध्ये उपलब्ध आहे.
डिझाईन आणि डिस्प्ले
6.7 इंचांचा Full HD+ Super AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह अत्यंत स्मूद अनुभव देतो. Corning Gorilla Glass Victus Plus संरक्षणासह फोनला स्टायलिश लूक देणारा वॉटरड्रॉप नॉच डिझाईन आहे.
कॅमेरा विभागात झगमगाट
फोनच्या मागील बाजूला 50MPचा OIS युक्त मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. 13MPचा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी योग्य आहे. यासह 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, नाईट मोड आणि लो-लाइट शूटिंगचे फिचर्सही आहेत.
प्रोसेसर, OS आणि एआय सुविधा
Samsung चा Exynos 1380 प्रोसेसर आणि Android 14 वर आधारित OneUI 15 वर चालणारा हा स्मार्टफोन Google Gemini आधारित स्मार्ट AI फिचर्सना सपोर्ट करतो – Circle to Search, Gemini Live, आणि AI Select यांसह. सॅमसंगने तब्बल 6 वर्षांचे OS अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅचेसची हमी दिली आहे.
बॅटरी आणि चार्जिंग
Galaxy M36 5G मध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी असून ती 25W Type-C चार्जिंगला सपोर्ट करते. यामुळे दिवसभर सहज वापर शक्य आहे.
Amazon वर विक्री लवकरच
12 जुलैपासून Amazon वर Prime Day Sale मध्ये हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. सॅमसंगच्या अधिकृत स्टोअरवरही तो विक्रीस येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.