'एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्च

सचिन निकम
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

रिमोटसारखा चालणार एस पेन
सॅमसंगने नोट 9 मध्ये ब्लूटूथशी कनेक्ट असलेला एस पेन दिला आहे. लिहिण्यासाठी किंवा चित्र बनविण्यासाठी वापरण्यात येणारा पेन आता सर्व काही करू शकेल. या एस पेनच्या माध्यमातून तुम्ही फोटो क्लिक करणे, स्लाईडचे प्रेझेंटेशन करणे, व्हिडिओ प्ले करणे अशा अनेक गोष्टी रिमोटसारख्या करू शकता. तुमच्या पूर्ण मोबाईलच्या कंट्रोल या पेनवर करता येईल.

नवी दिल्ली : ब्लूटूथने कनेक्ट असलेला एस पेन, डीएसएलआर कॅमेराची वैशिष्ट्ये आणि लॅपटॉपवर काम करण्यासारखा अनुभव 'एस' हे सर्व आहे एकाच फोनमध्ये. मोबाईलच्या जगात सतत नवनवीन तंत्रज्ञान आणणाऱ्या सॅमसंगने तब्बल 1 टीबी (512 जीबी) आणि 128 जीबी क्षमता असलेला सॅमसंग नोट 9 हा मोबाईल आज (बुधवार) भारतात सादर केला. याबरोबरच सॅमसंगने यावेळी वॉच पण लॉन्च केले.

सॅमसंगने आपल्या नोट सिरीजमधील नोट 9 या मोबाईलचे गुडगावमधील एका हॉटेलमध्ये लॉन्चिंग केले. तीन रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या मोबाईलची बॅटरी क्षमता, अॅड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम यासह अन्य फिचर्स कमाल आहेत. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या आयटी आणि मोबाईल कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख आणि सीईओ डीजे कोह यांच्या हस्ते मोबाईलचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर सॅमसंग इंडियाचे मोबाईल बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आसिम वारसी यांनी मोबाईलमधील फिचरविषयी सविस्तर माहिती दिली. यातील 128 जीबी क्षमता असलेल्या मोबाईलची किंमत सुमारे 67 हजार 900 रुपये असून, 512 जीबी क्षमतेच्या मोबाईलची किंमत 84 हजार 900 रुपये आहे. 24 ऑगस्टपासून हा मोबाईल विक्रीस उपलब्ध असणार आहे.

सॅमसंगने या हँडसेटच्या डिस्प्लेची साईज 6.4 इंच ठेवली असून, 8.1 ही अॅड्रॉईडची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तसेच बॅटरीची साईजही 4000 एमएएच असणार आहे. त्यामुळे आपला फोन दिवसभर चालू राहिला तरी बॅटरी संपणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. 128 जीबी क्षमता असलेल्या हँडसेटला 6 जीबी रॅम देण्यात आली आहे. तर, 512 जीबी क्षमतेच्या हँडसेटची 8 जीबी रॅम असणार आहे. या दोन्ही हँडसेटचा बॅक कॅमेरा 12 मेगापिक्सल, तर फ्रन्ट कॅमेरा 8 मेगापिक्सल असणार आहे. मात्र, सीन ऑप्टिमायझर, लो डिटेक्शन, ड्युएल अपर्चर लेन्स यामुळे हा कॅमेरा कोणत्याही क्षणाला टिपू शकणार आहे. या हँडसेटची जाडी 8.8 मिमी आणि 201 ग्रॅम वजन असणार आहे. या मोबाईलला फेस रिकग्निशन कॅपेबिलीटीज, फिंगरप्रिन्ट, आय स्कॅनिंग सेन्सर असणार आहेत. तसेच वायरलेस चार्जिंग, हायब्रिड ड्युएल सिम, वॉटर आणि डस्ट प्रुफ अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत.  

रिमोटसारखा चालणार एस पेन
सॅमसंगने नोट 9 मध्ये ब्लूटूथशी कनेक्ट असलेला एस पेन दिला आहे. लिहिण्यासाठी किंवा चित्र बनविण्यासाठी वापरण्यात येणारा पेन आता सर्व काही करू शकेल. या एस पेनच्या माध्यमातून तुम्ही फोटो क्लिक करणे, स्लाईडचे प्रेझेंटेशन करणे, व्हिडिओ प्ले करणे अशा अनेक गोष्टी रिमोटसारख्या करू शकता. तुमच्या पूर्ण मोबाईलच्या कंट्रोल या पेनवर करता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samsung Galaxy Note 9 to launch in India