
स्मार्टफोन प्रेमींसाठी खुशखबर आहे
गॅलेक्सी S24 5G मोबाईलवर 25 हजारची सूट मिळतेय
चला तर मग जाणून घ्या ही ऑफर नेमकी कुठे आहे
Samsung Galaxy S24 Flipkart Offer : सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S24 5G च्या किमतीत तब्बल 25000 रुपयांची कपात केली आहे. गेल्या वर्षी लाँच झालेला हा फोन आता फ्लिपकार्टवर लाँच किमतीपेक्षा 33% स्वस्तात उपलब्ध आहे. 79,999 रुपये किमतीत लाँच झालेला हा फोन आता केवळ 49,999 रुपयांपासून सुरू होतो. याशिवाय बँक ऑफर्स आणि 48,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर खरेदीला आणखी आकर्षक बनवते. जुना फोन एक्सचेंज करून हा फोन आणखी स्वस्तात मिळवता येईल.