Samsung Galaxy Tab : Samsung च्या स्मार्ट टॅबची किंमत घसरली, 20 हजाराच्या आत मिळतोय नवाकोरा टॅब

अलीकडेच Samsung ने Galaxy एस-सीरीज स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली होती
Samsung Galaxy Tab
Samsung Galaxy Tabesakal

Samsung Galaxy Tab :

मोबाईल फोन्स आणि स्मार्टफोन्सच्या किंमती वाढत आहेत. तर, अनेक कामात मदत करणाऱ्या Tablet च्या किमतीही अवाढव्य वाढल्या आहेत. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. Samsung ने Tabs च्या किंमती कमी केल्या आहेत.

अलीकडेच Samsung ने Galaxy एस-सीरीज स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली होती. आणि आता कंपनीने भारतात गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या Android टॅबलेटची किंमत कमी केली आहे. जर तुम्ही Medium Android टॅबलेट स्वस्तात खरेदी करण्याची वाट पाहत असाल. तर आता तुम्ही Samsung Galaxy Tab A9 खरेदी करण्याचा विचार करू शकता. (Samsung galaxy tab a9 plus get price cut in india)

Samsung Galaxy Tab
Upcoming Smartphones : मार्चमध्ये Samsung Galaxy F 15 ते Realme 12+5G हे दमदार स्मार्टफोन्स होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

हा Tab गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आला होता.  हा Android टॅबलेट दोन प्रकारांमध्ये येतो आणि कंपनीने दोन्ही Versions ची किंमत 3000 रुपयांनी कमी केली आहे.

Samsung Galaxy A9 गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च झाला होता. कंपनीने 8GB 128GB Wi-fi Version 20,999 रुपयांना आणि 4GB 64GB 5G Version 22,999 रुपयांना लॉन्च केला होता. 3,000 रुपयांच्या किमतीत कपात केल्यानंतर, 8GB व्हेरिएंट आता 17,999 रुपयांना खरेदी करता येईल.

Samsung Galaxy Tab
Samsung Upcoming Smartphone : मार्चच्या अखेरपर्यंत Samsung Galaxy M35 5G हा नवा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता, जाणून घ्या फिचर्स

तर,  Samsung Galaxy A9 च्या 5G वेरिएंटची किंमत देखील 3,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे आणि Galaxy A9 टॅबलेट गडद निळा, सिल्व्हर आणि ग्रे कलर या दोन ऑप्शनमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. यासोबतच सॅमसंग HDFC बँकेच्या कार्डवर 4500 रुपयांची झटपट सूटही देत ​​आहे.

Samsung Galaxy Tab A9 मध्ये 11-इंचाचा WQXGA डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1920x1200 पिक्सेल आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. हा Android टॅबलेट Octa-core Snapdragon 695 chipset सह येतो.

Samsung Galaxy Tab
SAMSUNG Galaxy Tab S7+वर मिळवा २९ हजारांची सूट

या टॅबला 128GB स्टोरेज आहे. जो मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येतो. व्हिडिओ कॉलसाठी डिव्हाइस 8MP मागील कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. या सॅमसंग टॅबमध्ये Strong 7,040 mAh बॅटरी आणि 15W Fast चार्जिंग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com