कोणी फोन मागितल्यानंतर तुम्हाला टेंशन येतं का? चिंता नको; सॅमसंगचे क्विक स्विच आणि इंटलिजंट कंटेट सजेशन आहे ना

जाहिरात
Tuesday, 13 October 2020

तुम्हाला कोणी फोन मागितल्यानंतर तुम्हाला टेंशन येतं का? पण, आता चिंता करू नका. तुमच्या प्रायव्हसीसाठी सॅमसंग क्विक स्विच आणि इंटलिजंट कंटेट सजेशन हे दोन फिचर घेऊन येत आहे. 

तुम्हाला कोणी फोन मागितल्यानंतर तुम्हाला टेंशन येतं का? पण, आता चिंता करू नका. तुमच्या प्रायव्हसीसाठी सॅमसंग क्विक स्विच आणि इंटलिजंट कंटेट सजेशन हे दोन फिचर घेऊन येत आहे. 

पार्टनर फिचर, एचटी ब्रँड स्टुडिओ 

मिलेनिअल्स आणि GEN Z वापरण्यासाठी फक्त एकच बहुपयोगी साधन उपलब्ध आहे, ते म्हणजे स्मार्टफोन. मित्रांना मेसेज करणे, टीम वर्क ते ऑनलाइन क्लासेस सर्वकाही तुमच्याकडे असलेल्या स्मार्ट फोनद्वारे शक्य होत असते. मात्र, आपल्या फोनची प्रायव्हसी जपण्याची वेळ येते तेव्हा आपल्याकडे काहीच पर्याय नसतो. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण एकाच घरात कितीतरी लोक राहतो. आपले नातेवाई किंवा कुटुंबातील सदस्य आपला संवाद ऐकत असतात. इतकेच नाहीतर तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रिनकडे देखील त्यांचे लक्ष जाते. त्यामुळे प्रायव्हसी गरजेची असते.

तुम्ही तुमचा स्मार्टफोन स्वत:पुरताच कसा मर्यादीत ठेवू शकता?

तुम्हाला तुमची प्रायव्हसी जपता यावी यासाठी सॅमसंगने दोन नवीन फिचर आणले आहेत, ते म्हणजे क्विक स्विच आणि इंटलिजंट कंटेट सजेशन. त्यामुळे तुम्हाला तुमचा सर्व डेटा सुरक्षित कसा ठेवायचा? याबाबत चिंता करण्याची गरजच पडणार नाही. या दोन फिचरमुळे तुमचा डेटा फक्त तुम्हीच पाहू शकता. हे दोन्ही फिचर सॅमसंग गॅलक्सी A51 आणि A71 वर उपलब्ध आहेत. क्विक स्विच अगदी त्याच्या नावाप्रमाणेच वापरण्यासाठी सोपे आहे. त्याला अक्टीव्हेट करण्यासाठी फक्त पॉवर बटनवर डबल क्लिक करावे लागेल. त्यानंतर दुसऱ्याला तुमच्या फोनमधील गॅलरी, ब्राऊजर तसेच तुमच्या आवडत्या अ‌ॅपचे पब्लीक व्हर्जन दिसेल. हे दोन्ही फिचर तुम्हाला कसे प्रोटेक्ट करतात? ते आपण पाहुयात -

गॅलरी: समजा तुम्ही नुकतेच सुट्टया संपवून ऑफीसला रुजू झाले. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला पिकनिकमधील काही गंमतीजमती स्मार्टफोन दाखवत असताना अचानक तुमचा बॉस आलाय. तर त्यावेळी काय करायचे हे सूचेनासे होते. त्यावेळी फक्त पॉवर बटनवर डबल क्लिक करा अगदी झटपट तुमच्या गॅलरीचे पब्लिक व्हर्जन दिसायला लागेल. राधिका मदन देखील याचा वापर करतेय, ते तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. 

चॅट: व्हेलेंनटाइन डे ला तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडसोबत बाहेर जाण्यासाठी एक सरप्राईज प्लान बनवायचा असेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या मैत्रिणीला चॅटींगवर काही टीप्स विचारत असता आणि तुमचा बॉयफ्रेंड बाजूलाच उभा राहून तुमच्या मोबाईलमध्ये पाहत असेल. त्यामुळे नक्कीच तुमचं सरप्राईज त्याला माहिती होईल. मग अशावेळी बॉयफ्रेंडला चॅट दाखवायची नसेल तर लगेच पॉवर बटनवर डबल क्लिक करा. लगेच व्हॉट्सअ‌ॅपचे पब्लिक व्हर्जन दिसायला लागेल आणि तुमचा प्लानही यशस्वी होईल. राधिका मदनचाही प्लान कसा यशस्वी होतो, हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

ब्राऊजर: तुमच्या बहिणीसाठी वाढदिवसाचे गिफ्ट घेण्यासाठी तुम्ही ब्राऊज करत असाल. त्यावेळी तुमची बहिण आजूबाजूला वावरत असेल तर तिला ते नक्कीच दिसेल आणि तिच्यासाठी ते गिफ्ट सरप्राईज राहणार नाही. त्यामुळे ती तुमच्या दिशेने येताना दिसताच तुम्ही लगेच ब्राऊजचे पब्लीक व्हर्जन स्विच करा. त्यामुळे तिच्या वाढदिवसाला नक्कीच सरप्राईज देता येईल. राधिका मदनला क्विक स्विच बटन सरप्राईज ठेवण्यासाठी कसं मदत करतेय ते तुम्ही खालील व्हिडिओत पाहू शकता.

दुसरे म्हणजे इंटलिजंट कंटेट सजेशन हे 'On Device AI' या फिचरमध्ये येते. त्याद्वारे सॅमसंग गॅलक्सी A51 आणि A71 या दोन्ही फोनवर तुम्हाला तुमची प्रायव्हसी जपता येते. 

On Device AI पॉवर इंजिन तुमचे फोटो प्रॉयव्हेट गॅलरीमध्ये मूव्ह करण्यासाठी तुम्हाला सजेशन देत असते. तुम्हाला जे फोटो हाईड करायचे असतील त्याला फक्त सिलेक्ट करावे लागले. त्यानंतर AI इंजिन सर्व फोटो प्रॉयव्हेट गॅलरीमध्ये मूव्ह करते.  सॅमसंग गॅलक्सी A51 आणि A71 या दोन्ही स्मार्टफोनवर हे फिचर कसं अ‌ॅक्टिव्हेट करायचं, ते खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. 

यापूर्वी कधी ALT Z लाइफबद्दल ऐकलंय?

इतर कोणी आपला स्मार्टफोन हाताळताना आपल्या फोनमधील प्रॉयव्हेट डेटा पाहील का? याची चिंता करण्याचे दिवस आता संपलेत. कारण सॅमसंगने क्विक स्विच आणि कंटेट सजेशन हे दोन्ही फिचर तुम्ही तणावमुक्त जीवन जगावे यासाठीच आणले आहेत. तुम्ही घरात किंवा मेट्रोमध्ये असाल तरी बिनधास्तपणे फोन वापरू शकता. कोणी तुमच्या फोनमध्ये डोकावून पाहत असेल तरी चिंता करण्याचे कारण नाही. फोटो, व्हॉट्सअ‌ॅप आणि स्नैपच‌ॅटवर चॅटींग, इंस्टाग्राम स्क्रोलिंग सर्वकाही तुमची प्रायव्हसी जपत तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वापरू शकता. तुमच्या फोनमध्ये कोणीही डोकावलं तरी तुमची प्रॉयव्हसी जपली जाईल, याची हमी तुम्हाला सॅमसंग देतेय. त्यासाठी लवकरच घराबाहेर पडा आणि सॅमसंग गॅलक्सी A51 आणि A71 खरेदी करा.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samsung ntroduces two mind-blowing smartphone privacy innovations on Galaxy A51 and A71