जागतिक तंत्रज्ञान कंपनी इनग्राम मायक्रोने दीर्घकाळ कार्यकारी संजीब साहू यांची कंपनीच्या ग्लोबल प्लॅटफॉर्म समूहाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. साहू येणाऱ्या काळात कंपनीच्या प्रगतीसाठी नव्या रणनीतीचे नेतृत्व करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
साहू कंपनीच्या Xvantage प्लॅटफॉर्मची आणखी वाढ करण्याच्या संधी ओळखण्यासाठी आणि ते कार्यान्वित करण्यासाठी जगभरातील प्रमुख कंपन्यांना मदत करतील. साहू हे भविष्यात नव्या योजना आणि आयामांनी कंपनीच्या प्लॅटफॉर्म स्ट्रॅटेजीवर त्यांचे लक्ष केंद्रित करतील. तसेच Xvantage शी थेट जोडलेल्या ऑपरेशनल मेट्रिक्स आणि वाढीवर लक्ष देऊन ते त्यांची व्याप्ती वाढवत आहेत.