Internet एकदम स्लो झालंय? 'या' टिप्स वापरुन पहा, मिनिटातच इंटरनेट फास्ट चालेल

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : सध्या स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असून कंपन्या स्मार्टफोनमध्ये डेटा वापरण्यासाठी युझर्सना एक से बढ़कर एक असा डेटा प्लॅन देत आहे. नेटवर्क बळकट करण्यासाठी देखील बर्‍याच प्रकल्पांवर कंपन्या काम करताना दिसत आहेत.

बर्‍याच कंपन्या 4G VoLTE सपोर्टसह स्मार्टफोन लॉन्च करत आहेत, परंतु बर्‍याच ठिकाणी नेटवर्कची समस्या वाढत असून इंटरनेट नीट चालत नसल्याने यावरती कंपन्या काम करत आहेत.

अशा प्रकारे फोनमध्ये 4G नेटवर्कचे स्पीड वाढवू शकता

  • सर्वात आधी आपल्याला आपल्या फोनच्या सेटिंग्जवर जावे लागेल.
     
  • सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला नेटवर्क सेटिंग पर्याय निवडावा लागेल.
     
  • येथे आपल्याला प्राधान्यकृत नेटवर्क ऑप्शनवर जावे लागेल आणि 4G किंवा LTE पर्याय निवडावा लागेल.
     
  • या व्यतिरिक्त नेटवर्क सेटिंगमध्येच अॅक्सेस पॉइंट नेटवर्क (APN) सेटिंग योग्य निवडले आहे, की नाही हे तपासले जाणे आवश्यक आहे. योग्य APN निवडले नसल्यास, APN पर्यायावर जाऊन सेटिंग्ज डीफॉल्टवर सेट करावी.

आपल्याला माहिती आहे, फोनमध्ये असलेले अ‍ॅप्स इंटरनेटची गती देखील कमी करतात. कारण, बर्‍याच वेळा अ‍ॅप्स Background चालू असतात आणि डेटा खर्च करतात. कमी डेटा वापरण्यासाठी, व्हिडिओचा अॅटो प्ले मोड बंद करा आणि अ‍ॅप्समधील मीडिया फाइल्सचे अॅटो डाउनलोड देखील थांबवा, त्यामुळे आपला डेटा सुरक्षित राहिल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com