मोबाईलमधील इंटरनेटचा डेटा वाचवा

प्रा. योगेश हांडगे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

मोबाईलमध्ये इंटरनेट वापरताना काळजी घेऊन डेटाचा खर्च कमी केला, तर आपले पैसे वाचविता येतील. मोबाईलमधील इंटरनेटचा डेटा वाचविण्याकरिता कुठले उपाय उपलब्ध आहेत, त्याची माहिती घेऊ या!

अनेकदा आपल्या मोबाईलचा डेटा नकळत खर्च होत असतो. यामुळे इंटरनेटचा कमी वापर करूनदेखील वापरले तरी इंटरनेट पॅक लवकर संपतो. मोबाईलमध्ये इंटरनेट वापरताना काळजी घेऊन डेटाचा खर्च कमी केला, तर आपले पैसे वाचविता येतील. मोबाईलमधील इंटरनेटचा डेटा वाचविण्याकरिता कुठले उपाय उपलब्ध आहेत, त्याची माहिती घेऊ या!

 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

गुगलचे नवे ‘ट्रॅंगल ॲप’
सध्या या ॲपची फिलिपीन्समध्ये चाचणी सुरू असलेल्या गुगलच्या ॲपमध्ये मोबाईल डेटाची बचत करण्याचे संपूर्ण सोल्युशन ‘ट्रॅंगल’मध्ये असेल. आपल्याला माहीत नसताना ‘घुसखोरी’ करणारी अनेक ॲपदेखील ब्लॉक करण्याची सोय या ॲपमध्ये आहे.

ट्रॅंगल ॲपमध्ये काही ॲप केवळ १० ते १५ मिनिटेच सुरू ठेवण्याची परवानगी आपण देऊ शकतो. या ॲपमध्ये मोबाईलचा डेटा बॅलन्स आणि वापरलेला डेटा अशी माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसते. सध्यादेखील हे ॲप गुगल प्लेवर उपलब्ध आहे. मात्र ते केवळ ठराविक भागासाठी कार्यरत असल्याने डाउनलोड करता येणार नाही. 

 हेही वाचा :  गुगलचा मिनी स्पीकर

ऑटो अपडेटिंग ॲप
गुगल प्लेमध्ये होणाऱ्या ॲप अपडेशनमुळे मोबाईलचा सर्वाधिक डेटा खर्च होतो. बहुतेक स्मार्टफोन वापरकर्ते प्ले स्टोअरमध्ये ‘सेट टू ऑटो अपडेट्‌स ॲप्स’ असा पर्याय निवडतात. ज्यामुळे मोबाईलमधील ॲपचे अपडेटेड व्हर्जन बाजारात दाखल झाल्यावर लगेच त्यांचे ॲप अपडेट होते. ज्यासाठी मोबाईलचा सर्वाधिक डेटा खर्च होतो. हा डेटा खर्च वाचविण्याकरिता प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऑटो अपडेट ॲपऐवजी ‘डू नॉट ऑटो अपडेट ॲप’ किंवा ‘ओन्ली ओव्हर वाय-फाय’ हा पर्याय निवडावा. त्यामुळे ॲप आपोआप अपडेट होणार नाही. काही ठराविक ॲपच्याबाबतीत ही सुविधा हवी असेल, तर तुम्ही प्रत्येक ॲपच्या सेटिंगमध्ये ‘डू नॉट ऑटो अपडेट ॲप’ पर्याय निवडावा. 

रिस्ट्रिक्‍ट बॅकग्राउंड डेटा
अनेकदा ॲप आपण काहीही काम करत नसताना इंटरनेट खर्च करतो. हे थांबविण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन डेटा युजेसचा पर्याय निवडल्यावर तुम्हाला कोणते ॲप किती डेटा वापरते, याची माहिती मिळेल. त्यानंतर प्रत्येक ॲप सुरू केल्यावर तेथे खालच्या बाजूस असलेला ‘रिस्ट्रिक्‍ट बॅकग्राउंड डेटा’ असा पर्याय निवडावा. ज्यामुळे ॲप बंद असताना होणारा डेटा खर्च होणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Save Internet data on mobile