esakal | Whatsapp वर 'हे' नंबर करा सेव्ह; कोवीड काळात अन्नापासून औषधापर्यंत मिळेल मदत!
sakal

बोलून बातमी शोधा

whatsapp

Whatsapp वर 'हे' नंबर अवश्य सेव्ह करा!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप whatsapp आपली बरीच दैनंदिन कामे सोपी करतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने लोक एकमेकांशी संपर्क साधू शकतात. दरम्यान कोविडच्या काळातही या माध्यामातून एकमेकांची मदत करण्यात येत आहे. यासाठी काही मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. whatsapp च्या मदतीने आपण लसीपासून ते इतरही वेगवेगळ्या गोष्टींची मदत घेऊ शकता. जर आपल्याला त्याबद्दल माहिती नसेल तर जाणून घेऊया अधिक माहिती..(save-this-numbers-on-Whatsapp-for-help-in-covid-situation-marathi-news)

लसीकरण केंद्रे

लसीकरण केंद्रे शोधण्यासाठी आता सरकारने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या माध्यामातून आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर लसीकरण केंद्र सहज सापडेल. आपल्याला फक्त +919013151515 वर संदेश पाठवायचा आहे. येथे काही मूलभूत माहिती दिल्यानंतर आपण जवळच्या लसीकरण केंद्राबद्दल माहिती घेऊ शकता.

लसीकरण स्लॉट जाणून घेण्यासाठी

COVID-19 शी संबंधित मदतीसाठी आपण +41 79 893 1892 वर संदेश पाठवू शकता. लसीकरण स्लॉट जाणून घेण्यासाठी आपल्याला +91 78386 34968 वर संदेश पाठवावा लागेल. यामध्ये आपल्याला काही तपशील भरावा लागेल. यानंतर, जेव्हा स्लॉट रिक्त होईल, त्याबद्दल आपल्याला सूचित केले जाईल.

अन्नाची सुविधा मिळवून देण्यासाठी

गरजूंना अन्नाची सुविधा मिळावी यासाठी COVIDMealsForIndia.com हे संकेतस्थळ सुरू केले असून आता ते व्हॉट्सअ‍ॅपवरही उपलब्ध आहे. यासह जेवण प्रदात्यासह लोक कनेक्ट आहेत. यासाठी आपल्याला फक्त +91 888289316 वर संदेश पाठवावा लागेल.

वैद्यकीय मदतीसाठी

आपण आपल्या शहरातील वैद्यकीय मदतीसाठी 'Indiashield'शी संपर्क साधू शकता. यासाठी आपल्याला +91 90823 28320 वर संदेश पाठवावा लागेल. काही आवश्यक माहितीची पूर्तता केल्यानंतर, आपण आवश्यक औषधे मिळवू शकता. त्याचप्रमाणे, आपण COVIDAsha कडून वैद्यकीय आणि अन्न संबंधित मदत घेऊ शकता. यासाठी आपल्याला +91 76765 22535 वर व्हाट्सएप करावे लागेल

loading image