Airtel, Vi आणि Jio चे दररोज 2 GB डेटा देणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या | Recharge Plan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vi reliance jio airtel vodafone idea

Airtel, Vi आणि Jio चे दररोज 2 GB डेटा देणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मोबाईल डेटा सध्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, सध्या भारतासह जगभरातील लोकांचा इंटरनेटता वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान जर तुमचा वापर जास्त असेल आणि तुम्ही जास्त डेटा ऑफर करणारे प्लॅन शोधत असाल, तर आज आपण Vodafone Idea, Airtel, Jio चे बेस्ट मोबाइल प्रिपेड डेटा प्लॅन बद्दल जाणून घेणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा मिळतो.

Airtel, Vodafone Idea आणि Jio या तिन्ही दिग्गज कंपन्या 1 GB ते 3 GB पर्यंत दैनंदिन डेटा प्लॅन ऑफर करत आहेत. Vodafone ने एक विशेष डबल डेटा ऑफर देखील सादर केली आहे, जिथे कंपनी निवडक सर्कलमध्ये प्लॅनच्या दुप्पट डेटा ऑफर करत आहे. आज आपण तेच प्लॅन पाहाणार आहोत, ज्यामध्ये कंपनी दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा देत आहे.

Airtel

एअरटेलचा सर्वात स्वस्त 2GB डेली डेटा प्लॅन 252.54 रुपयांपासून सुरू होतो. या प्लॅनमध्ये दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएससह फ्री, अमर्यादित लोकल आणि नॅशनल कॉलिंग देखील उपलब्ध आहे. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. कंपनीचा. 295.76 चा प्लॅन देखील आहे जो 252 च्या प्लॅन प्रमाणेच फायदे आणि वैधता देतो, परंतु यामध्ये तुम्हाला Amazon प्राइम चे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Airtel च्या 380.51 आणि 591.53 च्या डेटा प्लॅनमध्ये 252.54 च्या प्लॅन सारखेच फायदे आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा, मोफत अमर्यादित लोकल आणि नॅशनल कॉलिंग, रोज फ्री 100 एसएमएस मिळतात. त्यांची वैधता मात्र वेगळी आहे. Airtel चे 380.51 आणि 591.53 चे प्लॅन अनुक्रमे 56 दिवस आणि 84 दिवसांची वैधता देतात. जर तुम्हाला एकाच वेळी पूर्ण वर्षाचे रिचार्ज करायचे असेल, तर कंपनी 2116.95 रुपयांचा प्लॅन देखील ऑफर करते, ज्याचे सर्व फायदे वर नमूद केलेल्या प्लॅनसारखेच आहेत, फक्त यामध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळेल.

हेही वाचा: येतेय Jeep ची सर्वात स्वस्त सब-कॉम्पॅक्ट SUV; जाणून घ्या डिटेल्स

Vodafone Idea

व्होडाफोन आयडिया लिमिटेड सध्या एक विशेष डबल डेटा ऑफर देत आहे. या अंतर्गत, कंपनीच्या 299 , 449 आणि 699 रुपयांच्या प्लॅनवर डबल डेटा उपलब्ध आहे. यापूर्वी, या प्लॅनमध्ये दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध होता आणि आता मर्यादित कालावधीसाठी, या प्लॅन्सवर दररोज 4 GB डेटा उपलब्ध आहे. त्यांची वैधता अनुक्रमे 28 दिवस, 56 दिवस आणि ८४ दिवस आहे. या तीन प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल आणि नॅशनल कॉलिंग, दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. याशिवाय व्होडाफोन वापरकर्त्यांना 499 रुपयांचे व्होडाफोन प्ले सबस्क्रिप्शन आणि 999 रुपयांचे ZEE5 सबस्क्रिप्शन मिळते. मात्र दोन्ही सबस्क्रिप्शन आयडीया ग्राहकांसाठी नाहीत.

1.5 GB डेटा प्रतिदिन प्लॅनमध्ये, कंपनी पूर्ण वर्षाच्या वैधतेसाठी एक रिचार्ज प्लॅन ऑफर करते, परंतु 2 GB डेली डेटासाठी असा कोणताही लॉंग टर्म वॅलिडीटी असलेला प्लॅन उपलब्ध नाही.

हेही वाचा: Tata Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकचे नवीन व्हेरियंट भारतात लॉन्च

Reliance Jio

जिओच्या 249 रुपये, 444 रुपये, 599 रुपये आणि 2399 रुपयांच्या चारही प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस आणि Jio ते Jio वरून फ्री अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच Jio वरून इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी, या चार योजनांमध्ये अनुक्रमे 1,000, 2,000, 3,000 आणि 12,000 नॉन-Jio FUP मिनिटे मिळतात आणि त्यांची वैधता अनुक्रमे 28, 56, 84 आणि 365 दिवस आहे.

Jio चा 2,599 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन देखील आहे, ज्याचे फायदे आणि वैधता रु. 2,399 प्लॅन प्रमाणेच आहे, परंतु वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये 10 GB अतिरिक्त डेटा आणि Disney+ Hotstar सदस्यता मिळेल. तुम्हाला वार्षिक प्लॅन तसेच डिस्ने हॉटस्टार सदस्यत्व हवे असल्यास, हा प्लॅन तुमच्यासाठी नक्कीच बेस्ट आहे.

loading image
go to top