एसबीआय बँकेच्या ऑनलाइन बँकिंगसाठी काही सुरक्षित टिप्स...  

प्राजक्ता निपसे
Tuesday, 21 July 2020

आपल्या बँकेच्या ग्राहकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने इंटरनेट बँकिंग ट्रान्झॅक्शनसाठी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काही टिप्स दिल्या आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या टिप्स 

पुणे : गेले अनेक दिवसांपासून हॅकर्स ऑनलाइन युजर्सच्या बँक अकाउंटच्या डिटेल्सची चोरी करण्यासाठी अनेकानेक  पद्धत वापरत  आहेत. सायबर क्राईम हि एक समस्या बनली आहे. त्यातच बँकिंग सेक्टर सध्या हॅकर्सच्या हिटलिस्टवर आहेत. त्यांनी अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. बँकिंग ऑनलाइन फ्रॉड खूप वाढत आहेत.

कोरोनाच्या काळात डिजिटल पेमेंट्स सुद्धा वेगाने वाढत आहेत. याच धर्तीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने इंटरनेट बँकिंग ट्रान्झॅक्शनसाठी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काही टिप्स बँकेच्या ग्राहकांसाठी दिल्या आहेत. ४५ सेकंदाच्या या व्हिडिओत एसबीआयने सुरक्षित अश्या ऑनलाइन बँकिंगच्या टिप्स सांगितल्या आहेत. जाणून घ्या टिप्स 

एसबीआयकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत वेगवेगळी वेळ दाखवण्यात आली आहे. जाणून घ्या यासंबंधी....

१  जर तुम्हाला कोणताही फ्रॉड कॉल, ईमेल आणि टेक्स्ट मेसेज सेंड केल्यास तो मॅसेज      लक्षपूर्वक वाचा. त्याच मॅसेजमध्ये अर्जंट पेमेंट करण्यास सांगितले जावू शकते.

२  किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये एक असा व्यवहार दिसेल जो तुम्ही कधी केला नाही.

३  जर तुम्ही कोणासोबत सुद्धा माहिती किंवा अकाउंट संबंधीत माहिती शेयर केली असेल.

एसबीआयने नेट बँकिंगचा वापर करणाऱ्या खातेदारांना सल्ला दिला आहे की, जर का अशी बँकिंग सायबर फ्रॉड झाली तर तुम्ही तात्काळ पोलिस स्टेशनला जावून गुन्हा दाखल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग (https://cybercrime.gov.in/) येथे रिपोर्ट लिहा. सायबर क्राईम छोट्याशा घटनेला सुद्धा कधीही लपवू नका. तात्काळ याची तक्रार संबंधितांन द्या.अशी माहिती  देशाची सर्वात मोठी सरकारी बँकेने दिली. 

एसबीआयने आपल्या ट्विट मध्ये सांगितले कि , सावधान आणि दक्ष  राहून सायबर - क्रिमिनल्स पासून तुमची सुरक्षा करा. सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही हे करू शकता. अधिक अचूक माहिती साठी https://bit.ly/3h0jWie या वेबसाईटला कृपया भेट द्या.

हेही वाचा : एखादा जेम्स बॉण्डच या फोटोतील कोणता झेब्रा पुढे आणि कोणता मागे ? आहे हे सांगू शकतो.

भारत सरकारचे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल एक चांगला उपक्रम आहे. या अंतर्गत पीडित व्यक्ती किंवा तक्रारदार सायबर क्राईमची तक्रार ऑनलाइनही नोंदवू शकतात. NSCR हे पोर्टल देशाचे गृहमंत्रालयाच्या अधिकाराअतंर्गत काम करते आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sbi bank Warns Account Holders About Banking Frauds Shares Tips To Stay Safe