गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू आणि फेसबुकला नोटीस

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - इंटरेनेटचा वापर जसा वाढत आहे, तसे साबयरगुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. यातील लैंगिक गुन्ह्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्याच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी साबयरगुन्हे रोखण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू आणि फेसबुक सारख्या बड्या कंपन्यांना नोटीस बजावली आहे. 

एम.बी. लोकुर आणि यू.यू.ललित यांच्या खंडपीठाने ही नोटीस बजावली असून, याप्रकरणी 9 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्यायलयाने  बजावले आहेत.

हैदराबाद येथील प्रज्वला या स्वयंसेवी संस्थेनी सरन्यायाधीश एच.एल दत्तू यांना पत्र पाठवले होते. तेसेच बलात्काराचे दोन व्हिडिओ पेनड्राईव्हवर पाठवत तक्रार केली होती. त्यांची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. 

बलात्कारासारख्या गुन्ह्यांचे व्हिडिओ काढून ते सोशल मिडियावर टाकण्याचे गैरप्रकार होत असून, त्याला आळा घालण्यासाठी गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू आणि फेसबुक सारख्या कंपन्यांनी आवश्यक ती पावले उचलावीत असेही या याचिकेत नमुद करण्यात आले आहे. 

Web Title: SC issues notice to Google, Yahoo, Facebook and MS