esakal | वारंवार येत असलेल्या कॉल्सपासून कशी सुटका करायची? जाणून घ्या टिप्स

बोलून बातमी शोधा

frequent calls

तुम्हाला जर फोनवर सारखे स्पॅम कॉल येत असतील तर त्यापासून तुम्हाला सुटका करता येईल

वारंवार येत असलेल्या कॉल्सपासून कशी सुटका करायची? जाणून घ्या टिप्स
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

तुम्हाला जर फोनवर सारखे स्पॅम कॉल येत असतील तर त्यापासून तुम्हाला सुटका करता येईल. अशा कॉल्समुळे आपल्याकडून बऱ्याचदा महत्त्वाचे कॉल्स सुटले जातात. तसेच मोबाईलवर विविध व्हिडीओ पाहताना अशा कॉल्सचा बराच त्रास सहन करावा लागतो. काही युजर्स अशा कॉल्सला वैतागून मोबाईल फ्लाईट मोडला टाकतात, पण हा उपाय नेहमी वापरता येण्यासारखा नाही. चला तर जाणून घेऊया या त्रासापासून मुक्त होण्यासाठी काय करता येईल...

कॉल्स फॉरवार्ड करु शकता-
- तुमचा मोबाईल फ्लाईट मोडला टाकण्यापेक्षा तुम्ही ते कॉल्स फॉरवार्ड करू शकता.
- यासाठी फोनच्या सेटींगमध्ये तुम्हाला पहिल्यांदा कॉलचा पर्याय मिळेल.
- तिथे तुम्हाला Call Forwarding ऑप्शन मिळेल.

-Call Forwarding ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर ‘Always Forward’, ‘Forward When Busy’ आणि‘Forward When Unanswered’ असे तीन ऑप्शन्स मिळतील. 
- या तीन्हीतील एक ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला एक अल्टरनेटिव नंबर टाकावा लागेल.
- इथं तुम्ही असा नंबर टाकू शकता जो उपयोगात नसेल किंवा तो स्विच ऑफ असेल
- तो नंबर टाकल्यानंतर तो इनेबल करा. त्यानंतर तुम्हाला कोणताच नंबर त्रास देणार नाही.