esakal | चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा

बोलून बातमी शोधा

Whatsapp.

सॉफ्टवेअर हॅक करणारे मेसेज पाठवल्यास त्यावरही कारवाई होऊ शकते

चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

दिवसेंदिवस देशात WhatsApp चा वापर वाढत आहे. आज देशात जे लोक ऍंड्रॉयडचा वापर करतात त्यांच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp दिसेल. पण WhatsApp चा वापर हा सुरक्षित केला पाहिजे. चला तर जाणून घेऊया व्हॉट्सअ‍ॅपवरून कोणता मेसज पाठवू नये याबद्दल जाणून घेऊया. तरीही तुम्ही मेसेज पाठवला तर तुम्हाला जेलमधेही जाऊ लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस पाठवताना काळजी घ्यायला हवी.

तेढ निर्माण करणारे मेसेज पाठवू नका-
जर आपण कोणत्याही चित्रपटाची पायरेसी लिंक किंवा 21 दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे मेसेज पाठवत असाल तर आपले तुमचे अकाउंट बंद केले जाऊ शकते. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेज एन्क्रिप्ट केलेला आहे, मग मेसेजमध्ये काय लिहिले आहे हे दुसऱ्यांना कसे समजते? जर एखाद्याने तुमच्या विरुद्ध तक्रार केली तर त्यावेळी तुमचे मेसेज पाहिले जाऊ शकतात.  

तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर धमकावणी, धमकावणारे असभ्य मेसेज पाठवल्यास ते धोकादायक ठरू शकतो. जर तुमच्या विरुद्ध एखाद्याने तक्रार केली तर तुम्हाला पोलिस स्टेशनची हवा खावी लागू शकते.

WhatsApp वर कुणालाही भडकावणारे मेसेज पाठवले तर ते मोठे धोकादायक ठरू शकते. अशा पद्धतीचे काही आलेले मेसेज फॉरवर्ड केल्यास त्याचा मोठा तोटा होऊ शकतो. तसेच WhatsApp वर कुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणेही गुन्हा मानला जातो. इंडियन पीनल कोड अंतर्गत चुकीचे मेसेज पाठवल्यास त्यावर कारवाई होऊ शकते.

बल्क मेसेज पाठवणेही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ते टाळायला हवे. तसेच सॉफ्टवेअर हॅक करणारे मेसेज पाठवल्यास त्यावरही कारवाई होऊ शकते.