PAN Card मध्ये बदल करण्यासाठीचा सोपा ऑनलाईन मार्ग; माहित करून घ्या

pancard
pancard

औरंगाबाद: पॅनकार्डमधील नाव कसं बदलाल- पॅनकार्डवर नाव बदलण्याची अनेक कारणे असू शकतात (लग्नानंतरचे नाव बदलणे किंवा इतर कारणे). काही वेळेस पॅनकार्डवर नाव चुकीच्या पद्धतीने छापलेले असू शकते. Aadhaar eKYC द्वारे पॅनवरील नाव अपडेट कसे करायचे याबद्दलही जाणून घेऊया. जर आपले नाव आधार कार्डमध्ये बरोबर असेल तर खाली दिलेल्या माहितीनुसार कृती करा. जर आधार मधील नाव बरोबर नसेल तर आपल्याला इतर कागदपत्रे द्यावी लागतील. तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट सारखे इतर अधिकृत कागदपत्रे सबमिट करू शकता.

PAN Card अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?
पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी तीच कागदपत्रे आवश्यक आहेत, जी नवीन पॅन कार्ड तयार करताना आवश्यक आहेत. आयडी प्रूफ, अ‍ॅड्रेस प्रूफ आणि जन्मतारीख यासाठी तुम्हाला कागदपत्रांची आवश्यकता असेल. आयडी प्रूफ ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इ. मधील कागदपत्रे. अ‍ॅड्रेस प्रूफमध्ये विजेचे बिल, पाण्याचे बिल, मतदार ओळखपत्र चालू शकतील. जन्मतारखेसाठी दहावीचं परीक्षा प्रमाणपत्र इ. साठी कागदपत्रे आवश्यक आहेत.

1. पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी एनएसडीएल किंवा यूटीआयटीएसएल ( NSDL, UTITSL) वेबसाइटला भेट द्या. एनएसडीएल साइटवर गेल्यानंतरची प्रोसेस समजून घेऊया.

2. सुरुवातील ऍप्लिकेशन टाईपवर जावा. त्यानंतर Changes or Correction in existing PAN Data / Reprint of PAN Card वर क्लिक करा. तिथं माहिती भरल्यानंतर कॅप्चा कोड टाकल्यानंतर सबमीट करा.

3. त्यानंतर तुम्ही पॅनसाठी तुम्ही कागदपत्रे कशी देऊ इच्छिता यावर क्लिक करावं लागेल. तुम्ही e-KYC द्वारे कागदपत्रे देऊ शकता पण त्यासाठी आधारकार्ड गरजेचे असेल. स्कॅन केलेला फोटो ई-साइनद्वारे दस्तऐवज पाठवू शकता. माहिती भरल्यानंतर लाल (*) चिन्ह जिथे दिसेल तिथे नेक्स्ट वर क्लिक करा.

4. लाल (*) चिन्हाच्या जागी आपली वैयक्तिक माहिती भरा. नंतर नेक्स्ट वर क्लिक करा.

5. आधारवरील माहिती चेक करा. त्यानंतरच सबमीट बटनावर क्लिक करा.

6. ईकेवायसी भरल्यानंतर आम्ही मागितलेली माहिती भरल्यानंतर Proceed वर क्लिक करा.

7. त्यानंतर तुम्हाला पेमेंटची रक्कम दिसेल. यासाठीPay Confirm वर क्लिक करा.

8. पेमेंटचा माहिती भरून पेमेंट करा. त्यानंतर नवीन पेड उघडेल आणि तुमचं पेमेंट यशस्वी झाल्याचं समजेल. त्यांनंतर बॅंक रेफरंन्स नंबर आणि ट्रान्सॅक्शन नंबर मिळेल तो सेव्ह करून ठेवा. त्यानंतर Continue वर क्लिक करा.

9. यानंतर, आधार प्रमाणित करणे आवश्यक आहे. आधार कार्ड नंबरच्या खाली असलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि नंतर Authenticate क्लिक करा.

10. जर तुमची माहिती आधार कार्डवरील माहितीशी जूळत असेल तर Continue with e-Sign / e-KYC वर क्लिक करा.

11. चेक बॉक्सवर क्लिक केल्यानंतर Generate OTP वर क्लिक करा. 

12. यानंतर ओटीपी टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.

13. त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल जिथं ऍप्लिकेशन फॉर्म दिसेल. तो पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करा. तसेच तुम्हाला ईमेलद्वारेही हा फॉर्म प्राप्त होईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com