

Scientists Discover Octopuses Use Reflections to Locate Hidden Food
sakal
Octopuses learn to use mirrors to find prey and navigate hidden spaces: आरसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक साधा भाग आहे. आपण स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी किंवा मागे काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचा वापर करतो. मात्र आरशातील प्रतिबिंब समजून घेणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. कारण आरशात दिसणारी वस्तू प्रत्यक्षात वेगळ्या ठिकाणी असते. अनेक प्राण्यांसाठी हे समजणे सोपे नसते.
गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ विविध प्राण्यांच्या आरशावरील प्रतिक्रिया अभ्यासत आहेत. काही मोजक्या प्राण्यांना आरशातील प्रतिबिंबाचा उपयोग करून लपलेल्या वस्तू शोधता येतात, असे आढळले आहे. आता एका नव्या संशोधनातून ऑक्टोपसलाही ही क्षमता असल्याचे समोर आले आहे.