

Yamaha Tricity 300: First Look at Built-in Airbag System
esakal
रस्त्यावरील प्रवास म्हटला की टू-व्हीलर चालकांसाठी सुरक्षितता हा नेहमीच चिंतेचा विषय असतो. चारचाकी गाड्यांमध्ये सुरक्षिततेसाठी एअरबॅग्जचे कवच असते पण स्कूटर्स आणि बाईक्सच्या बाबतीत मात्र रायडर्स थेट अपघाताच्या धोक्याला सामोरे जातात.
अनेकदा महागडे रायडिंग गिअर्स किंवा जॅकेट्स खरेदी करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही किंवा ते रोज वापरण्याचा कंटाळा केला जातो. याच समस्येवर मात करण्यासाठी आता तंत्रज्ञान क्षेत्राकडून एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.