
कंपन्यांकडून मजबूत अशा स्क्रीन तायर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण फोन पडल्यानंतर त्याची स्क्रीन फुटली तर त्यावर मात्र काही उपाय करता आलेला नाही.
नवी दिल्ली - स्मार्टफोनच्या जगात आता किपॅड असलेले मोबाइल दुर्मिळ झाल्याचं चित्र आहे. मोठी स्क्रीन असेलेल्या स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र यात स्क्रीन फुटल्यास मोबाइलच्या वापराची मजाच निघून जाते. कंपन्यांकडून मजबूत अशा स्क्रीन तायर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण फोन पडल्यानंतर त्याची स्क्रीन फुटली तर त्यावर मात्र काही उपाय करता आलेला नाही.
दक्षिण कोरियातील रिसर्चर्सचे म्हणणे आहे की, त्यांना यात यश मिळालं आहे. एका रिसर्च प्रोजेक्टमध्ये लिन्सीड ऑइलला मायक्रो कॅप्सूलच्या रुपात स्क्रीनमध्ये लावण्यात आलं आहे. या कॅप्सूलमुळे क्रॅक्स दिसताच ते नीट करण्याचं काम करतात.
लॅब टेस्टमध्ये संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे की, जेव्हा स्क्रीन डॅमेज झाली तेव्हा ट्रान्सपरन्ट लिन्सीड ऑइल रिलिज होत आणि क्रॅक झालेल्या भागात पसरलं. ऑइलने सर्व क्रॅक रिपेअर केले. संशोधकांचा दावा आहे की, ही प्रोसेस स्क्रीन डॅमेजला दुरुस्त करते आणि 20 मिनिटांच्या आतच 95 टक्के क्रॅक्स फिक्स करू शकते.
हे वाचा - खुशखबर! 20 हजार रुपयांनी स्वस्त झाला आयफोन
लिन्सीड ऑइलचा वापर क्रिकेट बॅट दुरुस्त करण्यासाठी केला जातो. हे आर्ट पीसेसला सुरक्षित ठेवण्याचं काम करतं. यामध्ये कोणत्याही प्रकारचा रंग नसतो. तसंच सहजपणे उपलब्धही असतं. या प्रोसेसला काही तासांचा वेळ लागू शकतो. मात्र संशोधकांनी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये वॉर्मर टेम्परेचर आणि युव्ही लाइटच्या मदतीने लवकर केलं. कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डॉक्टर याँग चाई जुंग यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले. हे संशोधन स्टडी कंपोजिट पार्ट बी इंजिनिअरिंग जर्नलमध्ये पब्लिश झालं आहे. यामध्ये मटेरिअल कसं तयार करण्यात आलं आणि किती इफेक्टिव्ह होतं हे सांगितलं आहे.
हे वाचा - Look Back 2020 - जगभरात गुगलवर सर्वाधिक काय शोधलं माहिती आहे का?
पॉलिमर बिलायर फिल्मचं नाव याला देण्यात आलं आहे. एक प्रकारे दोन लेअरचं सँडविच असून याला एक मटेरिअल तयार करण्यासाठी वापरलं आहे. टॉप लेअरमध्ये लिन्सीड ऑइल कॅप्सूल आहे. तर बॉटम लेअरमध्ये फोन, टॅब्लेट्स आणि इतर गॅजेट्समध्ये वापऱण्यात येणारे काचेचे मटेरिअल असते. याचं नाव सीपीआय असं आहे. सीपीआय हे ट्रान्सपरन्ट प्लास्टिक असून ते स्ट्राँग आणि फ्लेक्झिबल असतं.