Look Back 2020 - जगभरात गुगलवर सर्वाधिक काय शोधलं माहिती आहे का?

google
google

नवी दिल्ली - सर्च इंजिन गुगलवर जगभरातून कोट्यवधी युजर्स क्षणाक्षणाला माहिती शोधत असतात. गुगलसुद्धा त्यांना हवी असलेली माहिती, त्याच्याशी संबंधित डेटा युजरला पुरवत असतो. गेल्या वर्षभरात कोरोनाने जगभरात थैमान घातलं. जगभरात लॉकडाऊनमुळे लोक घरात अडकून पडले होते. या काळात ऑनलाइन युजर्सचे प्रमाण प्रचंड वाढले. लोकांनी इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलेल्या शब्द, प्रश्न याबाबत गुगलने माहिती दिली आहे. यामध्ये लोकांना सर्वाधिक Why म्हणजेच का असा प्रश्न विचारणारा शब्द सर्वाधिक वेळा शोधला आहे.

गुगलने त्यांच्या इअर इन सर्चमध्ये यंदा काय शोधण्यात आलं याची यादी प्रसिद्ध केली आहे. यात सर्वाधिक शोधलेले शब्द, प्रश्न आहेत. गुगलच्या इन सर्च 2020 मध्ये कोरोना व्हायरसशी संबंधित प्रश्न आहेत.

गुगलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात मानवी कुतुहल ज्यातून दिसून येतं तो का? असा प्रश्न वर्षभरात सर्वाधिक शोधण्यात आला. याशिवाय इतर अनेक गोष्टींची माहिती लोकांनी गुगलवर शोधली.

कोरोना व्हायरसबाबत सर्वाधिक प्रश्न आणि माहिती विचारण्यात आली. यात सर्वाधिक विचारलेला प्रश्न होता तो म्हणे याला कोविड 19 का म्हटलं जातं? याशिवाय ब्लॅक लाइव्ह मॅटर का? ऑस्ट्रेलिया का जळत आहे? असेही प्रश्न विचारण्यात आले.

भारतात कोरोना व्हायरस वगळता इंडियन प्रीमियर लीग सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले. तसंच सर्वात जास्त ट्रेंडमध्ये राहिलेला एक प्रश्न होता तो म्हणजे पनीर कसं बनवायचं? हा प्रश्न लॉकडाऊनमध्ये जास्त वेळा सर्च करण्यात आला.

जगात आणखी एक प्रश्न विचारला गेला आणि त्यातून माणुसकीचं दर्शन झालं. तो प्रश्न म्हणजे मदत कशी करावी? याशिवाय मास्क इमोजी सर्वाधिक वेळा पोस्ट करण्यात आले. तसंच आई वडिलांसोबत प्रँक सर्चमध्ये राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com