सिंगल चार्जमध्ये Skoda ची इलेक्ट्रिक SUV कार धावेल ५२० किलोमीटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Skoda Enyaq
सिंगल चार्जमध्ये Skoda ची इलेक्ट्रिक SUV कार धावेल ५२० किलोमीटर

सिंगल चार्जमध्ये Skoda ची इलेक्ट्रिक SUV कार धावेल ५२० किलोमीटर

स्कोडा कुशाकला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर कंपनी लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. तिचे नाव स्कोडा इन्याक (Skoda Enyaq)आहे. स्कोडाने स्कोडा इन्याकला अगोदरच युरोपियन बाजारात उतरवले आहे. येथे तिला मोठे यश मिळाले आहे. यामुळे भारतीय बाजारात तिला उतरवले जात आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी आपल्या या इलेक्ट्रिक एसयूव्ही कारची संपूर्ण निर्मिती भारतात करेल. यातून भारतीय ग्राहकांचा आणखीन विश्वास वाढू शकेल. स्कोडाने या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे उत्पादन फाॅक्सवॅगन ग्रुपद्वारे बनवलेल्या लेटेस्ट एमईबी माॅड्यूलर प्लॅटफाॅर्मवर केले आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे पाॅवर आणि रेंजविषय म्हणाल तर कंपनीने या इलेक्ट्रिक एसयूव्हीला एडब्ल्यूडी आधारित स्पोर्ट्स व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. स्पीडबाबत स्कोडाच्या दाव्यानुसार हे इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ ६.२ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रति किलोमीटरचे वेग घेऊ शकते.

हेही वाचा: फक्त ८६ हजारांत मिळेल १.६ लाखाची Bajaj Pulsar RS200 स्पोर्ट्स बाईक

या बरोबर तुम्हाला मिळेल १८० किलोमीटर प्रतितास गती. स्कोडाच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे फिचर्सविषयी बोलाल तर यात शार्प एलईडी हेडलँप आणि एल शेपवाली एलईडी टेल लॅम्पची सुविधा आहे. या एसयूव्हीमध्ये पॅनोरॅमिक सनरुफचे प्रीमियम फिचर, कार कनेक्टेड टेक्नोलाॅजीबरोबर १३ इंचाचे टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम, व्हर्च्युल फुल डिजिटल काॅकपिट, मसाज फंक्शनवाली डायव्हर सीट, ट्राय जोन क्लायमेट कंट्रोल, ३६० डिग्री कॅमेरा क्रूझ कंट्रोल आणि ब्लाईंड स्पाॅट डिटेक्शन आदी फिचर दिले गेले आहेत. स्कोडाने ही इलेक्ट्रिक एसयूव्हीला रॅपिड चार्जिंगसह सादर केले आहे. त्यामुळे ही एसयूव्हीची बॅटरी ४० मिनिटांमध्ये ५ पासून ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.

हेही वाचा: Hero Motocorpची हटके एक्सप्लस 200 4व्ही भारतीय बाजारात दाखल

या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे टोटल आऊटपुट २२५ केडब्ल्यू आहे. त्यामुळे ती ३०२ बीएचपीची पाॅवर आणि ४६० एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करु शकते. युरोपियन बाजारात स्कोडाने या कारला मल्टिपल बॅटरी ट्रिम्ससह सादर केले आहे. त्यामुळे कारमध्ये ३४० किलोमीटरपासून ५२० किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार एसयूव्ही आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त केबिन स्पेससह सादर केली जाईल. त्यात ५८५ लीटरचे बूट स्पेसही दिले जात आहे. भारतात लाँच झाल्यानंतर स्कोडाची ही इलेक्ट्रिक एसयूव्हीचा ह्युंदाई कोना, एमजी जेडएस ईव्हीबरोबर स्पर्धा असेल, असे मानले जात आहे.

loading image
go to top