इन्स्टाग्रामवरूनही पाठवा व्हॉइस मेसेज 

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

केप टाऊन (द. आफ्रिका) : इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांना त्यातील डायरेक्‍ट मेसेज सुविधेद्वारे व्हॉईस मेसेज पाठविण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी केवळ आपल्या मोबाईलमधील ऍप अद्ययावत हवे. 

फेसबुकची मालकी असलेले हे ऍप्लिकेशन तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सुरुवातीला केवळ फोटो शेअरिंग एवढाच मर्यादित असणारा वापर कालांतराने वाढला. या ऍपचा आता व्यावसायिक कारणासाठीदेखील वापर होऊ लागला आहे. इन्स्टाग्रामने तरुण उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याच इन्स्टाग्राममुळे अनेक ब्लॉगरही हिट झाले. आता यूजर्सना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून व्हॉइस मेसेज करता येणार आहे. 

अँड्रॉईड आणि ऍपल अशा दोन्ही यूजर्ससाठी हे नवीन फिचर कार्यरत असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, ही सुविधा मिळण्यासाठी यूजर्सना सर्वांत आधी हे ऍप अपडेट करावे लागणार आहे. यासाठी डायरेक्‍ट चॅट या पर्यायामध्ये यूजर्सना आता एक माईकचे चिन्ह दिसेल. त्यावर क्‍लिक केल्यावर तुम्हाला व्हॉइस मेसेज करता येणार आहे. या व्हॉइस मेसेजमध्ये काही गडबड झाल्यास जावीकडे स्वाइप केल्यावर हा मेसेज रद्दही करता येणार आहे. 

यातील आणखी एक खास बाब म्हणजे आपल्याकडून रेकॉर्ड करण्यात आलेला व्हॉइस मेसेज अनसेंड करायची सुविधाही देण्यात आली आहे. यासाठी आपल्याकडून पाठवण्यात आलेला व्हॉइस मेसेज दीर्घकाळासाठी प्रेस करून ठेवावा लागेल. त्याठिकाणी अनसेंड हा पर्याय येईल आणि व्हॉइस मेसेज डिलीट करता येईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Send voice message through Instagram