कडाक्‍याच्या थंडीसाठी इलेक्‍ट्रिक जॅकेट

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

कडाक्‍याच्या थंडीत घराबाहेर पडणे फार अवघड जाते, मात्र नवे "उबदार'इलेक्‍ट्रिक जॅकेट तुम्हाला 60 अंश सेल्सिअसपर्यंत उष्णता देऊ शकेल!"टेक्‍निशे' या कंपनीने हे जॅकेट बाजारात आणले आहे."आयनगिअर'नावाचे हे जॅकेट बॅटरीवर चालते.

यामध्ये उष्णता निर्मितीसाठी लिथियम बॅटरी आणि कार्बन फिलॅमेंटचा वापर केला असून, त्यांची उष्णता नियंत्रित करता येते. त्यामुळे जॅकेट घालणारी व्यक्ती वातावरणानुसार जॅकेटचे तापमान सेट करू शकते. व्यायाम, अंगमेहनतीचे काम करणाऱ्यांसाठी, खडतर हवामानात सराव करणाऱ्या स्पर्धकांसाठी, तसेच लगेचच थंडी वाजणाऱ्यांसाठी हे कपडे बनविण्यात आले असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

बॅटरी चार्ज करून हे जॅकेट दुसऱ्या दिवसासाठी तयार ठेवता येतात. परिधान केल्यावर एक ते दोन मिनिटांत जॅकेट गरम व्हायला सुरवात होते. जॅकेट सेट केलेल्या तापमानानुसार साधारणपणे नऊ तासापर्यंत गरम राहू शकते. बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी चास तास लागतात आणि अशा प्रकारे पाचशे वेळा चार्ज करता येते. जॅकेट धुण्यापूर्वी हीटिंग फिलामेंट काढून ठेवाव्या लागतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Severe cold, electric jacket

टॅग्स