
Shai Hulud Virus Targets Indias Digital Infrastructure
esakal
Shai Hulud Virus : भारताच्या डिजिटल वर्ल्डला Shai Hulud (शाई हुलुद) नावाच्या नव्या सायबर व्हायरसने लक्ष्य केले आहे. सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत कार्यरत सायबर सुरक्षा एजन्सी CERT-In ने देशातील आयटी कंपन्या आणि स्टार्टअप्सना या धोक्याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. हा मालवेअर जावास्क्रिप्टच्या नोड पॅकेज मॅनेजर (npm) इकोसिस्टमला लक्ष्य करतो जे जगभरातील ओपन सोर्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे. यामुळे लाखो वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा धोक्यात येऊ शकतो.