Shivani Deshmukh : शिवानी देशमुख यांची इस्रोमध्ये निवड; दोन जागांच्या मुलाखतीत एकमेव महाराष्ट्रातील मुलीचे यश

शिवानीच्या मूळ गावात, कंझारा येथे तिच्‍या नातेवाइकांनी तिच्या या यशाचा आनंदोत्‍सव साजरा केला.
Shivani Deshmukh selected in ISRO
Shivani Deshmukh selected in ISROsakal
Updated on

खामगाव : अंतराळ संशोधन कार्यात नेत्रदीपक कामगिरी करून आणि नुकत्याच झालेल्या चांद्रयान मोहिमेत कुतूहलासह देशाला अभिमानास्पद यश मिळवून देणाऱ्या इस्रो या संशोधन संस्थेत ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) म्हणून मूळची बुलडाणा जिल्ह्यातील शिवानी राजीव देशमुख यांची निवड झाली आहे. दोन पदांसाठी हैदराबाद येथे झालेल्या मुलाखतीमध्ये शिवानीने हे यश मिळवले असून ते यश मिळवणारी ती एकमेव महाराष्ट्रीयन आहे.

शिवानी देशमुख ही मूळची बुलडाणा जिल्ह्यातील कंधारा (ता. खामगाव) येथील आहे. शिवानीचे वडील राजीव ऊर्फ निळकंठराव हिंमतराव देशमुख हे आर्वी (जि. वर्धा) येथे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. त्यामुळे शिवानी सध्या आर्वी येथील रहिवासी आहे.

तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण आर्वी येथेच झाले. बीएससीचे पदवी शिक्षण तिने अमरावतीच्या शिवाजी कॉलेजमधून, तर एमएससी नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्‍समधून पूर्ण केले. शिवानीने नेट, सेट या दोन्‍ही परीक्षाही उत्‍तीर्ण केल्यात व अमरावतीच्या शिवाजी विद्यालयात सहाय्यक अधिव्याख्याता म्‍हणून रुजू झाली.

शिवानीच्या मूळ गावात, कंझारा येथे तिच्‍या नातेवाइकांनी तिच्या या यशाचा आनंदोत्‍सव साजरा केला. शिवानीने या यशाने खामगाव तालुका, बुलडाणा जिल्ह्याचे, तसेच आर्वीचे नाव देखील राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे.

मला ईस्रोपर्यंत पोहोचता आले, याचा मला आनंद आहे. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे होते. आईवडिल माझ्यामागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी केलेले संस्कार व मार्गदर्शन यामुळेच आपणास ईस्रोपर्यंत पोहचता आले.

- शिवानी देशमुख

शिवानी ही लहानपणापासूनच हुशार होती व संशोधनात गोडी असल्‍याने तिने विज्ञान विषयात शिक्षण घेतले. श्रीशिवाजी विद्यालयात अध्यापन करीत असताना इस्रोच्या वतीने मिळालेल्‍या संधीचे तिने सोने केल्‍याचा सार्थ अभिमान आहे. तिच्‍या या यशाने आपल्‍या राज्‍याचे नाव संशोधन संस्‍थेत पोहचेल ही देखील आमच्‍या कुटुंबासाठी मोठी बाब आहे.

- राजीव देशमुख, वडील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.