

blue Motorola G-series smartphone with melted plastic back panel and cracked screen, alongside burnt jeans with a large irregular hole in the pocket area from the December 2025 explosion incident.
esakal
Motorola Blast Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे स्मार्टफोनच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मंगळवारी ३० डिसेंबरला शेअर झालेल्या या व्हिडिओत एका व्यक्तीच्या पँटच्या खिशात ठेवलेला मोटोरोला G सिरीजचा फोन अचानक जळाला आणि स्फोट झाला. परिणामी त्याच्या जीन्समध्ये मांडीजवळ मोठे जळलेले भोक पडले. सुदैवाने या घटनेत व्यक्तीला गंभीर इजा झाली नाही, पण व्हिडिओ पाहून अनेकांना धडकी भरली.