पायाच्या आकाराप्रमाणे वाढणारे 'शूज'

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

नाम्पा (अमेरिका) - आजकालची दुनिया स्मार्ट दुनिया आहे. म्हणजे स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, स्मार्ट कार, स्मार्ट होम अशी ही मारूतीच्या शेपटीप्रमाणे प्रचंड मोठी यादी आहे. त्यात आता स्मार्ट शूजची भर पडणार आहे. केंटन ली यांनी या स्मार्ट शूज निर्मिती केली असून, पायाच्या वाढत्या आकाराप्रमाणे हे शूज देखील मोठे करता येणार आहेत. अनेक गरिब मुलांना याचा फायदा होणार असल्याचे ली यांनी म्हटले आहे.

अगदी साध्या तंत्रझानाचा वापर करुन हे शूज तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे याची किंमत देखील कमी असेल. तसेच मुलांच्या पायाचा आकार भराभर वाढतो. त्यामुळे या वढत्या आकाराप्रमाणे शूजचा आकार बदलता येणार असल्याने सारखी शूजची खरेदी करण्याची गरज नाही. 

''बऱ्याच लोकांना वाटेल की शूज ही काही एवढी मोठी गोष्ट नाही. परंतु, अशी अनेक मुले आहेत ज्यांच्याकडे पायात घालायला काहीच नसल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांच्यासाठी हे शूज नक्कीच उपयोगी ठरतील. एक शूजची जोडी मिळाल्यावर अशा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहिला आहे. जगातल्या अशा अनेक गरजू मुलांना याचा लाभ घेता यावा अशी माझी इच्छा आहे.'' केंटन ली.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shoes that grow